Middle East War : भारतीय बंदरांवर मोठी कोंडी; 4 लाख टन बासमती अन् 5 हजार टन कांदा अडकला

इराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आणि मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा विपरीत परिणाम आता समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

Middle East War : भारतीय बंदरांवर मोठी कोंडी; 4 लाख टन बासमती अन् 5 हजार टन कांदा अडकला

Middle East War : भारतीय बंदरांवर मोठी कोंडी; 4 लाख टन बासमती अन् 5 हजार टन कांदा अडकला

Middle East War Shipment Stuck In Indian Ports : इराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आणि मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा विपरीत परिणाम आता समोर येण्यास सुरूवात झाली आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका जागतिक व्यापार मार्गांवर विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि पर्शियन आखातातून जाणाऱ्या पुरवठा साखळ्यांवर झाला आहे. एवढेच नव्हे तर या युद्धाची झळ आता भारताच्या पश्चिम किनारी व्यापार कॉरिडॉरवरदेखील जाणवत असून, जेएनपीटी (नवी मुंबई) आणि मुंद्रा बंदर (गुजरात) येथे लॉजिस्टिक कोंडी गंभीर पातळीवर पोहोचली आहे.

युद्धामुळे, प्रमुख शिपिंग कंपन्यांनी बुकिंग थांबवली

आखाती देशात उद्भवलेल्या संघर्षामुळे प्रमुख शिपिंग कंपन्यांनी बुकिंग थांबवली असून, केप ऑफ गुड होपच्याआसपासच्या लांब मार्गांवर जहाजे वळवली आहेत. यामुळे उच्च-मूल्य असलेल्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनांचे हजारो कंटेनर भारतीय बंदरांवर अडकले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये, विशेषतः वाशी एपीएमसीमध्ये वस्तू निर्यातीऐवजी परत बाजारात आणल्या जात आहे.

कृषी उत्पादनांना मोठा फटका

आखातात सुरू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका भारतीय कृषी उत्पादनांना बसला असून, सध्या भारतातील बंदरांमध्ये अडकलेल्या वाहतूक कोंडीत अंदाजे 4 लाख टन बासमती तांदळाचा समावेश आहे. ज्यात भारतीय बंदरांवर 2 लाख टन तर, वाहतूकीत असलेल्या जहाजांवर 2 लाख टन तांदळाचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय ताजी द्राक्षे 5 ते 6 हजार टन म्हणजे 300 हून अधिक कंटेनर अंदाजे 150 ते 200 कंटेनरमध्ये असलेला 5,400 टन कांदा जो प्रामुख्याने नाशिकमधील आहे. केळी आणि डाळिंब यांचा समावेश आहे. निर्यातीबरोबरच आयात केलेल्या औद्योगिक आणि जीवनावश्यक उत्पादनांवरही युद्धाचा मोठा परिणाम झाला असून, सल्फर आणि जिप्सम: ३ लाख टन शिपमेंटला विलंब झाला आहे. सुकामेवा आणि खजूरचे 600-700कंटेनर अब्बाससारख्या बंदरावर अडकले आहेत.

एलपीजीची वाहतूक करणारी 5 मोठी वाहक जहाजे वळवण्यात आली असून, काहींच्या प्रवासी तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा फटका भारताला बसला आहे कारण, भारतातील 85 % एलपीजी आणि 55% एलएनजी आयात होर्मुझ मार्गावर अवलंबून आहे त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. ऊर्जा पुरवठ्यातील या व्यत्ययामुळे घरगुती गॅसच्या किमती आणि उद्योगांसाठी खर्च वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version