Download App

रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार

  • Written By: Last Updated:

Dharampal Singh news : योगी सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह (Dharampal Singh) हे त्यांच्या एका कृतीमुळं चांगलेचं अडचणीत आले आहेत. रेल्वे पकडायची होती, मात्र पाऊस सुरू होता. त्यामुळं कपडे ओले होऊ नये म्हणून त्यांनी थेट आपली कारच रेल्वे फ्लॅटॉर्मवर नेली होती. मंत्र्यांची कार फलाटावर येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, पशुधन मंत्री धर्मपाल सिंह यांना लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडायची होती. लखनऊ ते बरेली-पंजाब गाडीत त्यांना जायचं होतं. मात्र, आपल्याला पोहोचायला उशीर झाला असं त्यांना वाटलं. शिवाय, पाऊसही पडत होता. पावसात कपडे भिजू नये, म्हणून त्यांनी आपली फॉर्च्युनर कार थेट ड्रायव्हरलला फलाटावर घ्यायला सांगितली.

69th National Film Awards : सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट 

फलाटावर गाडी येतांना पाहून प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मंत्र्यांची गाडी पाहून बिचारे प्रवासी सामान घेऊन इकडे तिकडे धावू लागले. मंत्री फलाटावर उतरले. मात्र, गाडी आली नव्हती. त्यामुळं ते बराच वेळ फलाटावर थांबले. तिथले पोलिसही मंत्र्यांना सलामी ठोकू लागले. त्यानंतर काही वेळात हावडा-अमृतसर पंजाब मेल प्लॅटफॉर्मवर आली आणि मंत्री चढून निघून गेले. त्याच्या महागड्या शूज किंवा कपड्यांचेही नुकसान झाले नाही. या सर्व घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर होत आहेत.

यावर अखिलेश यादव यांनी ट्विट करत मंत्री महोदयांवर टीका केली. “ते बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत हे बरे झाले…”, असा टोला त्यांनी लगावला.

अनेक नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटिझनने लिहिले, ‘जेव्हा विक्रम चंद्रावर उतरू शकतो, तेव्हा यूपीच्या मंत्र्यांची गाडी थेट प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाही का?’ असं विचारलं. तर आणखी एका नेटिझनने लिहिले, “धन्यवाद. ट्रेनने एकाही प्रवाशाला धडक दिली नाही, दिली असतीतरी तरी कोणी काय केले असते, मंत्री महोदयांचा सर्व प्रवाशांनी श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला पाहिजे. तर काही नेटकऱ्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या जप्त करण्याची मागणी केली.

दरम्यान, आता या मंत्र्यांवर कारवाई होते की नाही हे पाहावे लागेल.

Tags

follow us