केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी देणार राजीनामा, भाजपने राज्यसभेची उमेदवारी नाकारली

हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र काही विद्यमान खासदारांना वगळत नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

Untitled Design   2026 10 05T162217.100

Untitled Design 2026 10 05T162217.100

Minister Hardeep Singh Puri to resign : उत्तर प्रदेशातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र या यादीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजप राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीतून हरदीपसिंह पुरी यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 16 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, प्रियंका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा यांना देखील पुन्हा संधी मिळालेली नाही. भाजपच्या या यादीत दोन महिला उमेदवारांचा समावेश असून विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार, लूकआउट नोटीस जारी करा, नितेश राणेंची मागणी

हरदीपसिंह पुरी हे सध्या केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. उत्तर प्रदेशातून त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र भाजपच्या अंतिम यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना सुरूवात झाली आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, अंतिम यादीत पक्षाने काही विद्यमान खासदारांना वागलात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार निवडीमागील सामाजिक आणि राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाने रामगोपाल यादव आणि धनराज परिमल नथवाणी यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातील दहा राज्यसभा जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आठ उमेदवारांची घोषणा आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या उमेदवारांच्या माध्यमातून भाजप उत्तर प्रदेशातील राज्यसभा समीकरण कसे मांडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version