Meghalaya CM : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. यामध्ये पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. सीएम संगमा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. यामध्ये गारो हिल्स संघटनेचे लोक तुरा येथे हिवाळी राजधानीची मागणी करत आहे. यासाठी त्यांचे उपोषण सुरु आहे.
मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे तुरा येथील कार्यालयात आंदोलनकर्त्या संघटनांशी 3 तासांहून अधिक काळ चर्चा करत होते. दरम्यान, अचानक हजारोंचा जमाव सीएमओजवळ आला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. सीएमओ तुरा यांच्या खिडक्यांवरही दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत आणि गोंधळात 5 पोलीस जखमी झाले.
Pune Traffic मध्ये अभिनेता शस्त्रक्रिया झालेल्या आईसह तब्बल सहा तास अडकला !
जमावाने गेट तोडण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हिंसाचारात जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची स्वत: मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी विचारपूस केली. ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जखमी सुरक्षा कर्मचारी जमिनीवर बसल्याचे फोटोत दिसत आहे. मुख्यमंत्री संगमा त्यांच्या प्रकृतीची विचारणा करताना दिसत आहेत. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत हल्लेखोर जमावातील किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
काही दिवसांपूर्वी मेघालयातील मंत्री अम्पारीन लिंगडोह यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. ईस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक सिल्वेस्टर नॉन्गटिंगर यांनी सांगितले की, टिबोर लिटिंग असे या व्यक्तीचे नाव होते.