Download App

मोदी सरकारची दुसरी नोटबंदी : १ ऑक्टोबर २०२३ पासून २०००ची नोट ‘कागज का टुकडा’

  • Written By: Last Updated:

आरबीआयने व्यवहारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील ही दुसरी नोटबंदी आहे. सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा वापरण्या योग्य असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. नागरिकांना येत्या 30 सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा वापरता येणार असून, बदलून घेता येणार आहे.

दोन हजारांच्या नोटबंदीबाबत महत्त्वाचे मुद्दे

१) सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे

२) एटीएममध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा देखील काढून घेण्याच्या आदेश आरबीआयने दिलेले आहेत

३) बँकांच्या तिजोरीमध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा या आरबीआयकडे जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आरबीआयने याबाबत सूचना दिल्यानंतर या नोटा जमा करून घेण्यात येतील.

४) बँकांकडे सध्या असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा या अन फिट सदरामध्ये जमा झाले आहे.

५) बँकांनी तपासणी करूनच या नोटा जमा करून घेण्यात घ्याव्यात

६) 30 सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना नोटा जमा करता येतील

७) केवायसीची खातरजमा केल्यानंतरच या नोटा जमा करून घेण्यात येतील संशयास्पद व्यवहारांची माहिती तातडीने आरबीआयला देण्याचा आदेश देण्यात आले आह.

८) नागरिकांना एकावेळी कमाल वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करून मिळतील

९) दोन हजार रुपयांच्या नोटांचे डिपॉझिट करण्यासाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही

१०) नागरिकांनी 23 मेनंतर नोट बदलीसाठीच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आरबीआयने आवाहन केले आहे

११) नोटा बदलीसाठी दुर्गम भागातील नागरिकांसाठी मोबाईल व्हॅन वापरण्याचा आदेश

१२) जनधन खात्यामध्ये त्यांच्या मर्यादापेक्षा जास्त व्यवहार करण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. याचा अर्थ दोन हजार रुपयांच्या नोटांद्वारे काळा पैसा जनधन अकाउंटमध्ये जाणार नाही. याची काळजी घेण्याचा आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

१३) दोन हजार रुपयांच्या नोटा या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात ग्राह्य धरल्या जातील

१४) लोकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने गर्दीचे व्यवस्थापन करण्याची आरबीआयची बँकांना सूचना

Tags

follow us