Download App

Modi सरकारला हिरव्या रंगाचा इतका त्रास का ? ओवैसींचा संसदेत सवाल

नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. (Modi Govt) संसदेत बोलताना हैदराबादचे खासदार ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी अनेक प्रश्न मांडताना सरकारला हिरव्या रंगाची इतकी अडचण का ? मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू शकते का ? पंतप्रधान मोदी चिनी घुसखोरीवर बोलतील का ? बिल्कीस बानोला न्याय मिळेल का ? असा सवाल ओवेसींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलं.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अल्पसंख्याक योजनांसाठी तरतूद करण्यात आला, निधी कमी केल्याविषयी ओवेसी यांनी भाजप सरकारवर देखील जोरदार टीका केली. आपल्या देशातील लोकसंख्येचा भाग ज्या अल्पसंख्याकांनी व्यापला आहे, त्या अल्पसंख्याक वर्गाविषयी आम्ही राष्ट्रपतींच्या भाषणात एकदाही ऐकलं नसल्याचा त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच मुस्लिमांना कायमच हिरव्या रंगाशी जोडलं जातं, तुम्ही नेमकं कोणत्या गोष्टींवर बंदी घालणार असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

चीनच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का ? बिल्किस बानोला न्याय मिळणार का ? जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने नुकताच सादर केला, त्यात देखील अल्पसंख्याक वर्गाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करण्यात आलं. अल्पसंख्याक खात्यासाठी करण्यात आली असलेली तरतूद ही मागील वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के कमी असल्याचे ओवैसी यांनी म्हटलं. भाजपा आणि काँग्रेसवर ओवैसी यांनी कडाडून टीका केली.

काँग्रेस आणि भाजपा असे दोन पक्ष आहेत ज्यांनी अल्पसंख्याक या शब्दाला जन्म दिला. जे लोक प्रचंड संपत्ती घेऊन आपल्या देशातून पळून गेले आहेत त्या यादीत मुघलांचं नाव आहे का बघा. पण तुम्ही त्याबाबत कधीही काहीही बोलणार नाही, सोयीस्कर मौन बाळगणार असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात पुढे ओवैसी म्हणाले की जे लोक पैसे खाऊन पळून गेले आहेत, त्यात एकही नाव मुस्लिम नसल्याचा त्यांनी सांगितलं. हिंडनबर्ग प्रकरण भारतात झालं असतं तर त्यावर यूएपीए लागला असता असा जोरदार हल्ला त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा परदेश दौऱ्यावर जात असतात, तेव्हा गांधींचं नाव घेतता, त्यांना वाटत असतं की आपण जाऊन येईपर्यंत धर्मांमध्ये दोन गट पडायला नकोत, असे देखील यावेळी त्यांनी ओवैसी यांनी म्हटलं आहे.

follow us