Download App

‘पप्पू’ म्हणत ललित मोदींची एन्ट्री; राहुल गांधींना धमकी देत म्हणाले, आता मी…

  • Written By: Last Updated:

Lalit Modi Attack On Rahul Gandhi : मोदी आडनावावरून टीका केल्यानंतर खासदारकी रद्द झालेल्या राहुल गांधींच्या मागील अडचणी काही केल्या संपताना दिसून येत नाहीयेत. एकीकडे खासदारकी गेल्यानंतर मोदी सरकारविरोधात देशभरात आक्रमकता दिसत असतानाचा आता यावादात फरार ललित मोदीची एन्ट्री झाली आहे. त्यांनी राहुल गांधींना पप्पू म्हणत इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बापटांच्या जागी कोण? सूनबाईंपासून मोहोळ, मुळीक यांसह अनेक नावे चर्चेत

मोदी आडनावावरून केलेल्या टीकेविरोधात ललित मोदींनी ट्वीट करत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्याविरोधात यूकेमध्ये केस दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींचा प्रत्येक सहकारी मी फरार असल्याचे वारंवार सांगत असल्याचे मला दिसत आहे. का? कसे? आणि यासाठी मी कधी दोषी ठरलो? राहुल गांधी जे आता फक्त एक सामान्य नागरिक आहेत आणि सर्व विरोधी नेत्यांना दुसरे काम उरले नाही. एकतर त्यांच्याकडे चुकीची माहिती असते किंवा या लोकांमध्ये केवळ सूडाची भावना असते. त्यामुळे मी आता राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या कोर्टात केस दाखल करण्याचे ठरवले आहे. या लढाईत राहुल गांधी सबळ पुराव्यानिशी येतील अशी आशा असल्याचो ललित मोदींनी म्हटले आहे.

मोदींना अडकविण्यासाठी CBI चा दबाव होता; शहांच्या विधानाने खळबळ !

आरके धवन, सीताराम केसरी, मोतीलाल वोहरा, सतीश शर्मा हे सगळे गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. कमलनाथ यांना विचारा प्रत्येकाची परदेशात मालमत्ता आहे. मी प्रत्येकाचा पत्ता आणि फोटो पाठवू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. भारतातील जनतेला मूर्ख समजू नये असे म्हणत देशावर राज्य करण्यासाठीच गांधी घराणे बनले असल्याचे त्यांना वाटते असा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्या 15 वर्षात मी एक पैसाही घेतल्याचे सिद्ध झालेले नाही. मी जगाला सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा दिली आहे आणि हे सिद्ध झाल्याचेही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ललित मोदींच्या या ट्वीटनंतर आता मोदी आडनावाचा वाद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, ललित यांच्या या ट्विटला राहुल गांधी आणि काँग्रेस नेमकं कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us