Monsson Session of Parliament : 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून संसदेचे दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. त्यानंतर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. (Monsson Session of Parliament adjourned till Monday Due to Manipur Violence )
Manipur Violence : अतुलदादा तुझी आई, बहीण, बायको असती तर.., यशोमती ठाकूर यांनी पदर खोचला…
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं होत. त्यानंतर गदारोळ झाला. तर दुसरीकडे राज्यसभेमध्ये देखील 11 ला कामकाज सुरू झाल्यानंतर गदारोळ झाला. विरोधी पक्षाने मणिपूर घटनेवर चर्चेची मागणी केली. मात्र गोंधळ झाल्याने संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
सहकाऱ्यांचे हात धरले,अर्धा डोंगर चढला अन्…; CM शिंदेंनी सांगितला इर्शाळगडावरील ‘आँखो देखा हाल’
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची परिस्थिती निवळत नाही, त्यात आता दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन वातावरण तापलं आहे. दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ 4 मे रोजीचा असल्याचं समोर आलं आहे.
मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद थेट संसदेच्या अधिवेशनात उमटले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ताधारी सरकारला घेरण्यात आलं असून त्यावरुन गदारोळ झाला. गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.