Download App

अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर भारतीयांनी लावला; मध्यप्रदेशच्या शिक्षणमंत्र्याचे अजब विधान…

अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला हे विद्यार्थ्यांना शिकवायला हवे, असे शिक्षणमंत्री परमार म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Inder Singh Parmar : मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार (Inder Singh Parmar) यांनी मंगळवारी अजब वक्तव्य केलं. अमेरिकेचा (America) शोध कोलंबसने लावला नसून अमेरिकेचा शोध आपल्या पूर्वजांनी म्हणजेच भारतीयांनी लावला, असा जावईशोध त्यांनी लावला. बकरतुल्ला विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.

GOAT OTT: ‘गोट’ सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या सविस्तर 

राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत बरकतुल्ला विद्यापतीचा पदवी प्रदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला इंदर सिंग परमारही उपस्थित होते. यावेळी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 8व्या शतकात एका भारतीय खलाशी अमेरिकेत गेला आणि सॅन दिएगोमध्ये त्याने अनेक मंदिरे बांधली. याची नोंद आताही तिथल्या संग्रहालय आणि ग्रंथालयात जतन करून ठेवली आहे. आमच्या पूर्वजांनी अमेरिकेचा शोध लावला, तेव्हा तेथील संस्कृतीमध्ये आणखी भर घालण्याचे काम केलं. भारतीय विद्यार्थ्यांना ‘माया’ संस्कृतीबद्दल आणि आणि माया संस्कृतीचे तत्त्वज्ञान शिकवले पाहिजे. अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला हे विद्यार्थ्यांना शिकवायला हवे, असेही शिक्षणमंत्री परमार म्हणाले.

Video : शिमल्यात मशि‍दीवरून सुरू असलेला वाद चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज 

भारताचा शोध वास्को द गामाने लावला नाही…
पुढं ते म्हणाले, भारताचा शोध पोर्तुगालच्या वास्को द गामाने लावला नाही. वास्को द गामा चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याच्या मागे आलेला. व्यापारी चंदनचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा चारपट मोठे होते. परंतु इतिहासकारांनी भारतीयांना चुकीचा इतिहास सांगितला की, वास्को द गामाने भारताचा शोध लावला.

ते म्हणाले, इतिहासकारांनी पद्धतशीरपणे भारताच्या सामर्थ्याला कमी लेखले आणि चुकीच्या तथ्यांमुळे भारताची नकारात्मक प्रतिमा जगासमोर मांडली. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला हे खोटे भारतात विनाकारण शिकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

बीजिंग शहराची रचना भारतीय वास्तुविशारदाच्या मदतीने केली गेली होती, ज्याने भगवान रामाची मूर्ती तयार केल्या होत्या. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वात आधी ऋग्वेद लिहिणाऱ्यांनीच सांगितले, असे दावेही परमार यांनी केले.

follow us