MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची (MP Election 2023) जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच या इराद्याने भाजप मैदानात उतरला आहे. तिकीट वाटपात धक्कातंत्रात माहिर असेलली भाजपाची मंडळी मध्यप्रदेशात काही वेगळा प्रयोग करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सोमवारी पक्ष नेतृत्वाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तीन केंद्रीय मंत्र्यांसह चार खासदारांना मैदानात उतरवले आहे. यामध्य केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते या मंत्र्यांचा समावेश आहे. तर खासदारात राकेश सिंह, गणेश सिंह, रिती पाठक आणि उदय प्रताप सिंह यांचा समावेश आहे. आता अशी चर्चा सुरू झाली आहे की भाजपने या मंडळींना निवडणुकीत उतरवण्याचे कारण काय आहे.
नरेंद्र सिंह तोमर ठाकूर आहेत. ग्वाल्हेरातील चंबळ खोऱ्यातील दिग्गज नेते आहेत. केंद्रातील कृषी खात्यासह भाजपाने त्यांना मध्य प्रदेश निवडणूक प्रबंधन समितीचे संयोजकही केले आहे. तोमर यांचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवराज सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. 2008 ते 2023 पर्यंत त्यांनी मध्य प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत चंबळ परिसरात भाजपाची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. आता तोमर स्वतः निवडणुकीत उतरल्याने असा संदेश दिला जाईल की या परिसरातूनही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. यामुळे या परिसरातील 20-22 जागांवर परिणाम होऊ शकतो.
प्रल्हाद सिंह पटेल राज्यातील दिग्गज ओबीसी नेते आहेत. भाजपाने यंदा त्यांच्या भावाचे तिकीट कापून याच जागेवर प्रल्हाद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही पटेल मंत्री राहिले आहेत. सन 2005 मध्ये त्यांनी भाजपला रामराम केला होता. मात्र तीन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा घरवापसी केली. पटेल यांच्या उमेदवारीमुळे जवळपास दहा ते बारा जागा प्रभावित होतील.
MP Election 2023: मध्यप्रदेशात भाजपची दुसरी यादी जाहीर; केंद्रीय मंत्रीच उतरवले मैदानात
कुलस्ते हे आदिवासी नेते आहेत. समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळेच त्यांनी सातत्याने विजय संपादन केला आहे. राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी आरक्षित आहेत. तसेच 100 मतदारसंघात आदिवासी मते जय-पराजयाचे गणित निश्चित करतात. अशात भाजपाने कुलस्ते यांना तिकीट देत कमकुवत मतदारसंघ काबीज करण्याचे प्लॅन केल्याचे दिसत आहे.
यांचे पूर्ण नाव गणेश सिंह पटेल असे आहे. गणेश सिंह सतना मतदारसंघातून सलग चार वेळेस निवडून आले आहेत. ओबीसी आणि मंडल कमिशनच्या राजकारणातूनच त्यांनी राजकारणाची दिशा निश्चित केली. जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. जिल्हा पंचायत सदस्य आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उमा भारती यांनीच त्यांना भाजपात आणले होते. तसेच लोकसभेचे तिकीटही मिळवून दिले. राज्यातील विंध्य प्रदेशात अर्जुन सिंह कुटुंबाचे राजकीय पकड कमकुवत करण्याचे श्रेय गणेश सिंह यांनाच जाते.
जबलपूर मतदारसंघाचे खासदार राकेश सिंह यांना भाजपाने जबलपूर पश्निम मतदारसंघातून तिकीट दिले आहे. या मतदारसंघात मागील दोन निवडणुकात भाजपचा पराभव झाला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सिंह यांनी काँग्रेस उमेदवार विवेक तन्खा यांचा पराभव केला होता. राकेश सिंह जिल्हाध्यक्ष, खासदार, प्रदेश महामंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच AIADMK चा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय…
होशंगाबाद मतदारसंघाचे उदय प्रताप सिंह खासदार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कधीच पुढे जाणार नाही असे म्हणत त्यांनी 2013 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. 2014 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदय प्रताप सिंह यांनी या मतदारसंघात दुसऱ्यांदा विजय मिळवला.
राज्यातील सीधी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडे एलएलबीची पदवीही आहे. खासदार बनण्याच्या आधी पाठक या जिल्हा पंचायत अध्यक्ष राहिल्या आहेत.