Download App

MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !

MP Election 2023 : देशातील लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) होत आहेत. या निवडणुकासांठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. जोरदार प्लॅनिंग केले जात आहे. यातच आता काँग्रेससाठी गुडन्यूज आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील संभाव्य निवडणूक निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला आहे. टाइम्स नाऊ-नवभारतने हा पोल प्रसिद्ध केला आहे.  या अहवालानुसार, जर आज मध्य प्रदेशात निवडणूक झाली तर भाजपला 102 ते 110 जागा मिळतील. तर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना दोन जागा मिळतील. या निवडणुकीत भाजपाला 42.8 टक्के आणि काँग्रेसला 43.8 टक्के मते मिळू शकतात.

मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुुरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण

ज्योतिरादित्य शिंदेंची खेळी अन् काँग्रेसची सत्ताच गेली

मध्य प्रदेशात सध्या भाजपाची (MP Election  2023) सत्ता आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपाने काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना सोबत घेत सत्ता स्थापन केली.  या घटनेला तीन वर्षे उलटली आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात निवडणुका आहेत. भाजपाच्या या खेळीला उत्तर देत राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात त्यांना यशही येत असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी भाजपविरोधात राज्यात काही प्रमाणात नकारात्मक वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.

2018 च्या निवडणुकीतही काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष

निवडणुकीसाठी भाजपाने आतापर्यंत 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 9 खासदारांसह तीन केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजवर्गीय यांनाही रिंगणात उतरवले आहे. विजयवर्गीय इंदूर-1 मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार आहेत. मागील 2018 च्या निवडणुकीतही भाजपला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. भाजपला 109 तर काँग्रेलला 114 जागा मिळाल्या होत्या.  बसपाला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी तब्बल 15 वर्षांनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आला होता. पण, तरीही काँग्रेसला फक्त दीड वर्षेच सत्ता सांभाळता आली.

MP Election 2023 : ज्योतिरादित्य सिंधियांचे ‘विमान’ पुन्हा मध्य प्रदेशात ? आत्याच्या मतदारसंघातून तिकीट

राजस्थानात अटीतटीची लढाई

राजस्थानात काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना अंदाजे 42 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षात 0.60 टक्क्यांचं अंतर राहण्याची शक्यता आहे. अन्य पक्ष आणि अपक्षांना 15 टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी भाजपला 90 ते 105 तर काँग्रेसला 91 ते 101 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज