शेतकरी संकटात असताना मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका

सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झालीय. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत.

News Photo   2026 05 26T192952.276

शेतकरी संकटात असताना मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर (Petrol) देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे, त्यातच नीट पेपरफुटी प्रकरणावरुनही विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढ, पुरवठ्यावरुन विरोधकांनी आंदोलने सुरू केल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनीही थेट मोदींवर टीका करत, युद्ध आपल्या देशात नाही, तरी देखील आपल्यावर परिणाम झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरलं आहे.

नरेंद्र मोदींच्या पॉलिसीमुळेच भारत युद्धात सहभागी नसतानाही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागतंय. सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झालीय. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत. आज सोयाबीन, तुरीला पीक विमा मिळतं नाही. पण, अदानींचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है, आंदोलन अभी बाकी है.. आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, असे म्हणत प्रणिती शिंदेंनी केंद्रातील मोदी सरकावर टीका केलीय.

महागाई मानव! पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढताच राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका

शेतकऱ्यांवर जे संकट आज आलं आहे ते मुद्दाम आणलं गेलं आहे. इराणकडून तेल घ्यायचं बंद केलं नसतं तर आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसते. काही दिवसापूर्वी पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात खतं वापरू नका, खरीपाचा हंगाम असताना शेतकऱ्यांना खतं वापरू नका म्हणतात. शेतकऱ्यांना कोणी अडचणीत टाकलं, देशाला कोणी अडचणीत टाकलं असेल तर ते पंतप्रधानानी अडचणीत टाकलं आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

युद्ध आपल्या देशात नाही, युद्ध दूर देशात आहे तरी देखील आपल्यावर का परिणाम झाला? इंदिरा गांधींच्या काळात आपण युद्धात सहभागी होतो तरी देखील देश स्टेबल राहिला. मात्र, मोदींच्या पॉलिसीमुळे आज भारत युद्धात नसताना ही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागतंय. मोदी हे ट्रम्प तात्यांना आहारी गेले आहेत, ट्रम्प बोले मोदी डोले, अशी बोचरी टीकाही प्रणिती यांनी केली. तसेच, शेतकरी संकटात पडला आणि हे विमानात जाऊन मेलोडी मेलोडी करतं बसलेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version