मुंबई : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani)यांनी नुकताच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब गमावला. त्याच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स आणखी घसरले, यामूळे अब्जाधीशांच्या यादीत देखील त्यांची घसरण झाली आहे. याचा फायदा घेत अदानींना मात देत रिलायंस इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम ट्रॅकरनुसार, बुधवारी दुपारपर्यंत अदानीची भारतातील एकूण संपत्ती $13 अब्ज डॉलरने घसरून $75.1 अब्ज झाली आहे. बुधवारी दिवसाच्या सुरुवातीला ते आठव्या स्थानावर होते आणि दुपारपर्यंत ते यादीत 15 व्या स्थानावर गेले.
मुकेश अंबानी $83.8 अब्ज अंदाजे संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहे. काही दिवसांपूर्वी अदानी या यादीत चौथ्या क्रमांकावर होते, मात्र आता ते मुकेश अंबानींपेक्षाही एक स्थान खाली घसरले आहे.
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने (Hindenburg Research) 24 जानेवारी 2023 रोजी एक अहवाल प्रकाशित केला. यामध्ये अदानी समूहाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले असून कर्जाबाबतही दावे करण्यात आले आहेत. हा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
अदानी ग्रुपच्या प्रमुख अदानी एंटरप्रायझेसने बुधवारी 25% ची घसरण नोंदवली. अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या सहा अन्य समूह कंपन्याही तोट्यात होत्या.
टॉप 10 अब्जाधीशांची यादी
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क, तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या क्रमांकावर बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि फॅमिली, आठव्या क्रमांकावर लॅरी पेज, नवव्या क्रमांकावर मुकेश अंबानी आणि दहाव्या क्रमांकावर गौतम अदानी यांचे नाव आहे.