Download App

गुजरात खालसा करण्याची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर; वासनिकांकडे मोठी जबाबदारी

  • Written By: Last Updated:

Mukul Wasnik : आगामी पाच राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली. त्यानंतर आता कॉंग्रेसकडूनही भाजपचा पराभव करण्यासाठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जात आहेत. नुकतीच काँग्रेसने गुजरातचे प्रभारी सरचिटणीस म्हणून मुकुल वासनिक (Mukul Wasnik) आणि मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस म्हणून रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांची नियुक्ती केली आहे.

आज कॉंग्रेसने एक पत्रक जारी करत ही अधिकृत घोषणा केली. मध्य प्रदेशच्या वरिष्ठ निरिक्षकपदानंतर पक्षाने रणदीप सुरजेवाला यांच्याकडे प्रभारी सरचिटणीस पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. ज्येष्ठ नेते जेपी अग्रवाल यांच्या जागी सुरजेवाला यांना मध्य प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. तर मुकुल वासनिक यांच्याकडे गुजरातच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी दिवंगत खासदार राजीव सातव हे गुजरातचे प्रभारी होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही गुजरातचे प्रभारी म्हणून उत्तमरित्या जबादारी निभावली होती. त्यांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने 2004 साली गुजरातमध्ये बारा खासदार निवडणून आणले आहेत. दरम्यान, मोदी शहांच्या राज्यात पुन्हा एका मराठी व्यक्तीवर जबाबदारी

प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली.

कॉंग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, माजी आमदार अजय राय यांची उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बृजलाल खाबरी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली.

कोण आहेत मुकुल वासनिक?
मुकुल वासनिक हे राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत. त्यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. मुकुल यांचे वडील बाळकृष्ण वासनिक हे तीन वेळा खासदार होते. बाळकृष्ण वासनिक यांच्यानंतर वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी मुकुल वासनिक 1984 मध्ये बुलढाणामधून लोकसभेवर निवडून आले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 1991 मध्ये लोकसभेवर पुन्हा निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपद मिळाले. वयाच्या 34 व्या वर्षी ते केंद्रात मंत्री झाले. 2009 मध्ये, ते रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि त्यांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद भूषवले. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मुकुल वासनिक यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. 1984 मध्ये खासदार म्हणून दिल्लीत आल्यापासून वासनिक यांचे दिल्लीतील काँग्रेस वर्तुळात वजन आहे.

Tags

follow us