Download App

मोठी बातमी : मोदी कॅबिनेटचा दुसरा धडाकेबाज निर्णय; सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत केली मोठी घोषणा

पीएम हाऊसमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.

  • Written By: Last Updated:

Narendra Modi 3.0 Cabinet’s first decision : मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी कॅबिनेटची पहिली बैठक सध्या नवी दिल्ली येथे सुरू असून पीएम हाऊसमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.  या कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. PM आवास योजनेतंर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार आहेत.

बांधण्यात येणाऱ्या या घरांमध्ये एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शनदेखील असणार आहे. यापूर्वी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, गेल्या 10 वर्षांत पात्र गरीब कुटुंबांसाठी सुमारे 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या निर्णयापूर्वी मोदींनी आज पदाभार स्वीकारल्यानंतर सकाळी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करून तिसऱ्या टर्मचा पहिला निर्णय घेतला होता.

बातमी अपडेट होत आहे…
follow us