तुम्ही क्रेडिट घ्या, कोणाचे फोटो छापायचे ते छापा; नरेंद्र मोदी यांचा नारी शक्ती विधेयकावरून विरोधकांना जोरदार टोला

Narendra Modi - दक्षिण असो की उत्तर, पूर्वेकडे राज्य, छोटे असो किंवा मोठे राज्य असो. निर्णय प्रक्रियेत कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही.

Narendra Modi

Narendra Modi

Narendra Modi On Nari Shakti Vandana Bill : लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती विधेयक बिलावर (Nari Shakti Vandana Bill) लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभागृहात निवेदन केले आहे. दक्षिण असो की उत्तर, पूर्वेकडे राज्य, छोटे असो किंवा मोठे राज्य असो. निर्णय प्रक्रियेत कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही. कोणाबरोबर अन्याय करणार नाही. त्यामुळे या विधेयकाला विरोध करू नये. या विधेयकाचे तुम्ही क्रेडिट घ्या, कोणाचे फोटो छापायते छापा, त्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेही देतो, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काश्मीर असो कन्याकुमारी आम्ही तुकड्यात निर्णय घेत नाही आणि तसा विचार करत नाहीत. दक्षिण असो की उत्तरेतील, पूर्वेकडील राज्य असो, छोटे असो किंवा मोठे राज्य असो. निर्णय प्रक्रियेत कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही. कोणाबरोबर अन्याय करणार नाही. मला शब्दाचा खेळ करण्याची गरज नाही. आम्ही नारी शक्तीला त्यांचा हक्क देत आहे. आम्ही सगळ्यांना जाणतो, कोण कशी चलाखी करत होते. त्यांच्यात हिम्मत नाही आम्ही 33 टक्के आरक्षणाला विरोध करतो म्हणायला. त्यामुळे तांत्रिक मुद्दे शोधले जात आहे. तीन दशक हे विधेयक रोखले गेले. आता तरी अडचण आणू नका ? असा टोलाही मोदी यांनी लगावला आहे.

काही लोकांना वाटतं, यात मोदींचा स्वार्थ आहे. पण बरोबर चालले तर कोणाला फायदा होणार नाही. मला क्रेडिट नको आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्वांचे फोटो छापेल. तुम्ही क्रेडिट घ्या, सर्वांचे फोटो छापतो. कोणाचे फोटो छापायचे ते छापा, असा टोला नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

संसदेत महिलेची भागिदारी वाढविण्यासाठी, लोकशाहीत सुधारणेपुरते हे विधेयक नाही. ही महिलांच्याबाबतीत कमिटमेंट आहे. पंचायतमध्ये 50 टक्के महिलांना आरक्षण आहे. आम्ही अनुभव घेतला आहे. मी खूप वर्षे मुख्यमंत्रीरुपात जनतेची सेवा केली आहे. माझा अनुभव आहे संवेदनशील, समस्या सोडण्यासाठी महिलांची कमिटमेंट आहे. महिलांची नवी शक्ती तयार होईल. नवी विचार जोडला आहे. देशाची विकासात संवेदनशीलता जोडली जाईल. सभागृह समृद्ध होईल. आमच्या देशात अनुभवी नारीशक्तीची कमी नाही. सार्मथ्यवानमध्ये काही कमतरता नाही, असे मोदी म्हणाले.

Exit mobile version