Download App

केजरीवालांना दिलासा नाहीच! आत्मसमर्पण करावंच लागणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मागणीवर राउस अॅव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मागणीवर राउस अॅव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीनाची मुदत आज संपणार आहे अशा परिस्थितीत त्यांना उद्या सरेंडर करावे लागणार आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर कोर्टाकडून त्यांंना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

ईडीने कोर्टात अरविंद केजरीवाल यांचा काही वेळेआधीचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओत केजरीवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठकीसाठी जाताना दिसत आहेत. आरोग्याचे कारण आणि वैद्यकिय तपासणीचं कारण देत केजरीवाल यांनी सात दिवसांच्या जामीनाची मागणी केली होती. ईडीच्यावतीने न्यायालयात सांगितले की केजरीवाल यांनी दोन जूनला आत्मसमर्पण करणार असल्याचा खोटा दावा केला. यावर केजरीवाल यांचे वकील एन. हरिहरन म्हणाले, की त्यांच्या या वक्तव्याची आमच्याकडे माहिती नाही.

follow us

वेब स्टोरीज