Download App

अध्यक्षाचा तिढा सुटला, उपाध्यक्षपदासाठी लॉबिंग; विरोधकांचा ‘खटपटी’चा प्लॅन तयार

विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.

Lok Sabha Speaker : लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार हे कोडं (Lok Sabha Speaker) जवळपास सुटलं आहे. एनडीए सरकारमधील (NDA Government) घटक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे. विरोधकांकडून ही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. परंतु उपाध्यक्ष पदावरून खटपट होण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधी पक्ष यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.

येत्या 24 जून रोजी संसदेचे विशेष सत्र (Parliament Session) सुरू होणार आहे. विरोधी पक्षांनाबरोबर सहमती बनवण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना देण्यात आली आहे. ज्या पक्षांबरोबर आधीपासून संबंध चांगले आहेत त्या पक्षांना सोबत आणण्यावर आधी काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जे पक्ष इंडिया आघाडीत (INDIA Alliance) नाहीत त्यांनाही सोबत घेण्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने आधी बिजू जनता दल, वायएसआरसीपी आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांवर आहे.

LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या

काय आहे परंपरा?

आतापर्यंत असं दिसून आलं आहे की सत्ताधारी पक्ष लोकसभेचे स्पीकर पद स्वतःकडेच ठेवतो. मागील अनेक वर्षांपासून असाच प्रघात राहिला आहे. परंतु मागील सरकारच्या काळात उपाध्यक्षपद रिक्त राहिले होते. विशेष म्हणजे या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपदही रिक्त राहिले होते. विरोधी पक्ष यावर नाराज आहेत. आता या पक्षांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

इंडिया आघाडीचाही मोठा डाव

उपाध्यक्ष पदासाठी इंडिया आघाडीने सहमती बनवण्यास सुरुवात केली आहे. या आघाडीत अनेक अनुभवी नेते आहेत. अशा परिस्थितीत संसदेचे सत्र सुरू होण्याआधी एक बैठक बोलावण्याचा विचार केला जात आहे. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी एखाद्या नेत्याच्या नावावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाऊ शकतो. अध्यक्ष पदासाठीही उमेदवार देणार असल्याचे आघाडीतील नेत्यांकडून सांगितले जात होते. मात्र हा विचार आता मागे पडल्याचे दिसत आहे. कारण, जरी आघाडीने अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला असता तरी निवडून येण्याची शक्यताच नव्हती.

लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा ? नितीशकुमारांचा भाजपला पाठिंबा पण,’टीडीपी’ची भूमिका वेगळीच

follow us