Download App

कर्नाटकात भाजपला धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता भाजपचे टेन्शन वाढविणारी बातमी आहे. निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांचे प्रवेश सोहळे सुरू असतानाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने निवडणूक न लढण्याचा आणि राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अमित शाहांनी केली मोठी भविष्यवाणी; सांगितलं किती जागा जिंकत मोदी होणार तिसऱ्यांदा PM

या निर्णयामुळे भाजपला आता वेगळे नियोजन करावे लागणार आहे. कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी आज पार्टी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहीले. या पत्रात त्यांनी 10 मे रोजी होणारी विधानसभा निवडणूक लढणार नाही तसेच निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयांची माहिती दिली आहे.

कन्नड भाषेत लिहीलेल्या या पत्रात माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांनी लिहीले की हा निर्णय त्यांनी स्वतः घेतला आहे. ईश्वरप्पा हे त्यांच्या कार्यकळात नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. ईश्वरप्पा जून महिन्यात 72 वर्षांचे होतील. भाजपमध्ये नेत्यांना निवडणुका लढण्यासाठी आणि अधिकारिक पदांवर नियुक्त होण्यासाठी ही कमाल मर्यादा आहे. मात्र, काहीवेळेस अपवादही दिसून आले आहेत. भाजपने या निवडणुकीत अजूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली नाही.

राष्ट्रवादीही रिंगणात 

कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कली आहे. नागालँडमध्ये मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढणार आहे. काही मोजक्याच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे प्रसारमाध्यमांना दिली.

कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

काँग्रेस जिंकणार : पवार

कर्नाटक निवडणुकीबाबत शरद पवार यांनी मोठं भाकित केले. ते म्हणाले, राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. काँग्रेस सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना आता बदल हवा आहे आणि हा बदल भाजपचे उमेदवार घरी बसवून लोकांना हवा आहे, असे पवार म्हणाले होते.

 

Tags

follow us