Download App

मोठी बातमी! बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजुरांचा मृत्यू; मदतकार्य सुरू

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळला. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Bullet Train Bridge Collapse : गुजरात राज्यातील आणंद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर (Gujarat News) आली आहे. येथे मंगळवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेला एक (Bullet Train Bridge Collapse) पूल कोसळला. या दुर्घटनेत पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. तर तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस अधीक्षक गौरव जसानी यांनी सांगितले की हा अपघात वसाड या गावात घडला. नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) अधिकाऱ्यांनी सांगतिले पाया टाकण्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या इस्पात आणि काँक्रिट ब्लॉकपासून तयार करण्यात येत असलेला पूल ढासळल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही घटना वडोदरा जवळील माही नदी जवळच्या परिसरात घडली.

Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार

या दुर्घटने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची खात्री पोलिसांनी केली आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन अधिकारी धर्मेश गोर यांनी सांगितले की एकूण चार कामगार काँक्रिट ब्लॉक खाली अडकले आहेत. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. ढिगाऱ्यातून बाहेर  काढण्यात आलेल्या एकाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

आनंद पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पातील रेल्वे स्टेशन्सच्या कामांनाही गती मिळाली आहे. सध्या गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामांना सुरुवात झाली आहे. बोईसर आणि विरार येथील स्थानकांची पायाभरणी सुरू आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि दीव दमण येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दसऱ्याच्या दिवशीच धक्कादायक घटना; गुजरातमध्ये भिंत कोसळून ७ मजुरांचा मृत्यू

follow us