तामिळनाडूत रेल्वेला भीषण आग! 8 प्रवाशांचा मृत्यू तर 20 पेक्षा जास्त जखमी

Tamil Nadu Train Fire : तामिळनाडू राज्यात रेल्वेचा आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत रेल्वेतील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिलिंडर घेऊन जात असल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. Tamil Nadu train fire | An ex-gratia of […]

Train Fire

Train Fire

Tamil Nadu Train Fire : तामिळनाडू राज्यात रेल्वेचा आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत रेल्वेतील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिलिंडर घेऊन जात असल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही.

पुनालूर-मदुराई एक्सप्रेस या रेल्वेमध्ये आज पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मदुराई यार्ड येथे खासगी डब्यात ही आग लागली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अन्य डब्यांचे नुकसान झाले नाही. प्रवाशांनी गॅस सिलिंडर रेल्वेतून नेण्यास मनाई आहे. तरी देखील गॅस सिलिंडरमुळे रेल्वेत आग लागल्याचे दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली.

अपघात घडला ती एक खासगी टूरिस्ट ट्रेन असल्याची माहिती समोर येत असून यासंदर्भात रेल्वेकडून आधिक तपास केला जात आहे. लखनऊहून रामेश्वरला निघालेल्या या रेल्वेच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागल. मदुराई स्थानकाजवळ रेल्वे आल्यानंतर ही घटना घडली. जंक्शनजवळ ट्रेन थांबलेली असतानाच आग लागली अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आग कशामुळे लागली याचाही शोध घेतला जाईल. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत जे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version