Download App

मणिपूर मुद्द्यावरून विरोधकच पळ काढताहेत, सरकार चर्चेसाठी तयार; भाजपची टीका

  • Written By: Last Updated:

Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत बोलावे, अशी मुख्यतः विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत असतानाही मोदींनी लोकसभेत याप्रकरणी मौन बाळगले. दरम्यान, लोकसभेत बहु-राज्य सहकारी संस्था (दुरुस्ती) विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकार मणिपूरच्या मुद्दावर चर्चा तयार करण्यास तयार असल्याचं सांगितलं. (national union home minister amit shah in loksabha said government is ready for a discussion on-manipur)

सरकार चर्चेसाठी तयार – गृहमंत्री शहा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज पुन्हा पुन्हा तहकूब करावे लागले. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी लोकसभेत बोलतांना सांगितलं की, मी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांचे बहुमोल सहकार्य मागितले आहे. सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे. आणि त्यांना या संवेदनशील विषयावर चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.

अमित शाह यांचे ट्विट काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. त्यांनी सांगितले की, आज मी लोकसभेचे अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेतील मल्लिकार्जुन खर्गे या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्रे लिहून मणिपूर मुद्द्यावर चर्चेत अमूल्य सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. सरकारला काही भीती नाही. सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर हवी तितकी चर्चा करण्यास तयार आहे आणि सर्व पक्षांचे सहकार्य घेत आहे. हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष सहकार्य करतील अशी आशा आहे, असं ट्टिट शाह यांनी केलं.

सरकार नवीन सहकार धोरण आणणार – अमित शहा

तसेच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले की, आम्ही यावर्षी विजयादशमी किंवा दिवाळीपूर्वी नवीन सहकार धोरण आणू.

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक संवेदनशीलता दाखवत नाहीत- मीनाक्षी

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी मणिपूरच्या मुद्दावरून विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाले की, विरोधकांचे बेजबाबदार वर्तन सर्वांसमोर आहे. एकीकडे मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, असे सांगून ते देशाची दिशाभूल करत आहेत, मात्र या विषयावर संवेदनशीलता दाखवत नाहीत. हे लोक देशातील महिला, आदिवासी समाज आणि गरीब लोकांप्रती असंवेदनशील आहेत, अशी टीका मीनाक्षी यांनी केली.

मणिपूर चर्चेपासून विरोधकच पळत आहेत – गजेंद्र सिंह शेखावत

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, सरकारकडे लपवण्यासारखे काही नाही, आम्ही मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. विरोधक चर्चेची मागणी करून त्यापासून पळ काढत आहेत, हे दुर्दैव आहे. कारण त्यांना माहीत आहे की सरकारकडे बोट दाखवलं, तर त्या हाताची बाकीची बोटे त्यांच्याकडेच असणार आहेत.

Tags

follow us