Navya Haridas vs priyanka Gandhi Wayanad lok sabha by election: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या (wayanad lok sabha by election) पोटनिवडणुकीसाठी आता काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना पक्का झाला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (priyanka) यांच्याविरोधात भाजपने नाव्या हरिदास (Navya Haridas) यांना उमेदवारी जाहीर केलीय.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. दोन्ही मतदारसंघातून मोठा मताधिक्याने ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वायनाडच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रमाबरोबर लोकसभा पोटनिवडणूकही भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. या जागेवरून प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशा चर्चा होत्या. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली होती. त्यानंतर प्रियांका गांधी यांची काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती.
अजितदादांना आणखी एक धक्का; अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती ‘तुतारी’, पण पुतणीने टेन्शन वाढविले
प्रियांका गांधीविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार याची चाचपणी सुरू होती. शनिवारी भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने नाव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नाव्या हरिदास यांची राजकीय कारकीर्द
नाव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी केरळमधील कालिकत विद्यापीठाशी सलग्नित केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी टेकचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी कोझिकोडे महापालिकेतून राजकारणास सुरुवात केली. त्या नगरसेवक होत्या. सध्या भाजपच्या केरळ महिला मोर्चाच्या महासचिव आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत कोझिकोडे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी नशिब अजमावले होते. परंतु त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या होत्या. येथे काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या उमेदवारामध्ये फाइट झाली होती.
Video : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले, राखीची शपथ घेतो अन्…
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, नांदेडबाबत निर्णय नाही
आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगालच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसने येथून वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों के विधानसभा उप-चुनाव एवं लोकसभा उप-चुनाव 2024 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/C4IEhaunwY
— BJP (@BJP4India) October 19, 2024