Opposition Parties Meeting : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा विरोधकांची बैठक पार पडत आहे. आज (17 जुलै) आणि उद्या (18 जुलै) बंगळुरूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रमही ठरविण्यात आला आहे, त्यामुळे यावेळी प्रचारासाठी संयुक्त अजेंडा ठरविला जाण्याची शक्यता आहे. गत महिन्यात पाटणा येथे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक धोरण ठरवण्याच्या दृष्टीने अनिर्णित होती आणि बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. (NCP Chief Sharad Pawar will not go to the Bangalore for opposition meeting, )
दरम्यान, आजवर विरोधी एकतेचे मोठे नेते म्हणून पाहिले जाणारे शरद पवार या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र हे दोन्ही नेते केवळ पहिल्या दिवशी अनुपस्थित राहणार आहे. गुडघ्याच्या नुकत्याच झालेल्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण 18 जुलै रोजी अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबतच्या बैठकीत त्या सहभागी होणार आहे. तसेच 18 जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे या बैठकीत सहभागी होणार आहेत.
https://letsupp.com/maharashtra/big-changes-again-in-shindes-cabinet-the-responsibility-of-five-ministers-increased-68510.html
आत्तापर्यंत समोर आलेल्या विशेष माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान होणार आहे. ही औपचारिक बैठक असेल आणि त्यानंतर रात्री 8 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्व सभा सुरू होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.