Download App

मोठी बातमी! वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी ढकलली पुढं ; काय आहे कारण?

नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश या आधी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही

NEET PG Exam 2025 : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने हा निर्णय जाहीर केला आहे. या आधी नीट परीक्षा ही 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश

बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे. सर्वोच्च न्यालयाच्या आदेशानुसार, परीक्षा मंडळाला NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून परीक्षा देशभरात समान मानकांवर घेतली जाईल आणि कोणत्याही प्रकारची असमानता किंवा भेदभावाला वाव राहणार नाही.

कधी ऊन, कधी पाऊस; बदलत्या हवामानात मुलांची काळजी घेण्यासाठी महत्वाच्या टिप्स

या निर्णयानंतर, NBEMS ने असेही कळवले आहे की परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी योग्य आणि सुरक्षित परीक्षा केंद्रे ओळखली जात आहेत. परीक्षा केंद्रे अशा प्रकारे निवडली जातील की, तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येईल. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि निष्पक्षतेसाठी व्यापक व्यवस्था केल्या जात असल्याचं बोर्डाने म्हटलं आहे.

वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

एनबीईएमएसने विद्यार्थ्यांना कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये आणि परीक्षेशी संबंधित माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्याचं आवाहन केलं आहे. परीक्षेची नवीन तारीख आणि तपशीलवार वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासनही बोर्डाने दिलं आहे.

 

follow us

संबंधित बातम्या