Neet Exam question Paper Leak : नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणी (Neet Exam question Paper Leak ) केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत पेपर लिक होऊ नये, यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शांतता चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर हल्ला, होर्मुझ परिसरातील लष्करी ठिकाणे केली उद्ध्वस्त
अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून केंद्र सरकारकडून पेपर लिकच्या घटनेनंतर उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये केंद्र सरकार भारतीय सैन्याकडे ही जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात येत आहे. जर सैन्याकडे प्रश्नपत्रिकेच्या संरक्षणाची जबाबदारी गेल्यास कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडणार नाहीत, असा ठाम विश्वास असल्यानेच केंद्र सरकार असा विचार करीत आहे.
मिलिंद नार्वेकरांचा फडणवीसांना मध्यरात्री फोन, विधान परिषद निवडणुकीला ठाकरे फडणवीस जवळीक वाढली
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी आत्तापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे, मनिषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यांना अटक करण्यात आलीयं. सीबीआयकडून या आरोपींची कसून चौकशी सुरु असून यांनीच पेपर लिक केला असल्याचे पुरावे सीबीआयला तपासात मिळाले आहेत.
आतापर्यंतचा घटनाक्रम काय?
३ मे २०२६ : देशभरात NEET-UG परीक्षा पार पडली.
७ मे २०२६ : परीक्षेचा पेपर आधीच लीक झाल्याची माहिती समोर आली आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केंद्रीय यंत्रणांना याची कल्पना दिली.
१२ मे २०२६ : शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी NTA ने ही परीक्षा रद्द केली.
महाराष्ट्रातून कोणाकोणाला अटक झाली?
नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणी देशभरातून एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून ९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये शिक्षक, डॉक्टर आणि कोचिंग क्लास चालकांचा समावेश आहे.
मनिषा मांढरे (पुणे) – सह-मास्टरमाइंड
मनिषा मांढरे ही पुणे येथील बॉटनी (वनस्पतीशास्त्र) शिक्षिका आहे. ती NTA ची बायोलॉजी विषयाची तज्ज्ञ होती. सीबीआयच्या तपासानुसार मनिषा मांढरे या संपूर्ण घोटाळ्याची मुख्य सूत्रधार असून तिने बायोलॉजीचा पेपर लीक केलायं.
मनिषा हवालदार (पुणे) :
पुण्यातील एका शाळेची निलंबित मुख्याध्यापिका आणि फिजिक्स (भौतिकशास्त्र) शिक्षिका. ही देखील NTA ची विषय तज्ज्ञ होती आणि तिने फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे.
पी. व्ही. कुलकर्णी (लातूर/पुणे):
लातूरच्या नामांकित दयानंद सायन्स कॉलेजचे माजी शिक्षक आणि NTA चे केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषय तज्ज्ञ. त्यांनी केमिस्ट्रीचा पेपर लीक केला आणि लातूर-पुण्यात खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना थेट उत्तरं डिक्टेट केली.
तेजस शाह (पुणे):
पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’ (APMA) चा मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) आणि फिजिक्स शिक्षक. मनिषा हवालदारच्या मोबाईलमध्ये याचे नाव “God” (देव) या नावाने सेव्ह होते. हवालदारकडून फिजिक्सचा पेपर मिळवून तो पुढे पाठवण्याचे काम तेजसने केले.
डॉ. मनोज शिरुरे (लातूर):
लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ (Paediatrician). यांनी आपल्या नातेवाईकांसाठी आणि इतर बड्या घरांतील विद्यार्थ्यांसाठी पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्या माध्यमातून पेपर मिळवला. डॉ. शिरुरे यांच्याच हॉस्पिटलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी गुप्तपणे कोचिंग सेशन्स घेण्यात आले होते.
शिवराज मोटेगावकर (लातूर):
लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचे चालक. पी. व्ही. कुलकर्णी यांनी लीक केलेला मूळ पेपर डिजिटल स्वरूपात मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सापडला आहे.
मनिषा वाघमारे (पुणे):
पुण्यातील एक ब्युटिशियन. ती मनिषा मंधारेची शेजारी आहे. लाखो रुपये मोजून लीक झालेला पेपर खरेदी करण्यास तयार असणारे विद्यार्थी आणि श्रीमंत पालक शोधण्याचे (एजंटचे) काम ती करत होती. याशिवाय अहिल्यानगर आणि नाशिकमधील मध्यस्थांनाही यात अटक करण्यात आली आहे, ज्यांनी १० ते १२ लाख रुपयांना हा पेपर विकला होता.
घोटाळा कसा व्हायचा?
सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे की, NTA ने नियुक्त केलेल्या शिक्षकांनीच (कुलकर्णी, मंधारे, हवालदार) परीक्षेच्या १० दिवस आधी पेपर लीक केला. त्यानंतर लातूर आणि पुण्यात प्रभावशाली आणि श्रीमंत कुटुंबांतील मुलांसाठी ‘स्पेशल कोचिंग सेशन्स’ घेण्यात आले. तिथे विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्याची अचूक उत्तरे पाठ करून घेण्यात आली. यासाठी पालकांकडून २ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळण्यात आली. ही रक्कम बँक खात्यांद्वारे ट्रान्सफर झाल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत.
नुकतेच अटक करण्यात आलेले डॉ. मनोज शिरुरे आणि तेजस शाह यांना दिल्ली न्यायालयाने १ जून २०२६ पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. तर पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
