मोठी बातमी! NEET परीक्षेची नवीन तारीख जाहीर; 21 जून रोजी होणार परीक्षा

NEET Exam 2026 : NEET परीक्षेला बसणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने

मोठी बातमी! देशभरात गाजत असलेल्या 'NEET'परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षक ताब्यात

मोठी बातमी! देशभरात गाजत असलेल्या 'NEET'परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षक ताब्यात

NEET Exam 2026 : NEET परीक्षेला बसणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती मात्र पेपर फुटल्यामूळे परीक्षा रद्द करण्यात आली होती.

पेपर फुटल्याची बातमी 7 मे रोजी समोर आली होती, आणि त्यानंतर 12 मे रोजी एजन्सीने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयकडून सखोल चौकशी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. भारत सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, NEET (UG) 2026 परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, ही परीक्षा आता २१ जून रोजी आयोजित केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांना विनंती करण्यात येते की, परीक्षेसंबंधीच्या अपडेटेड माहितीसाठी त्यांनी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरच अवलंबून राहावे अशी माहिती एनटीएकडून या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. तसेच इतर कोणत्याही स्रोतावर विश्वास ठेऊ नका असं आवाहन देखील एनटीएकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version