Download App

NEET UG 2024 : ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचं स्कोअर कार्ड रद्द होणार; पुन्हा परीक्षा होणार

NEET UG निकाल 2024 प्रकरणी दाखल केलेल्या 3 याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज (दि. 13) सुनावणी झाली.

  • Written By: Last Updated:

NEET grace marks cancelled, re-test option for affected students : NEET UG निकाल 2024 प्रकरणी दाखल केलेल्या 3 याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज (दि. 13) सुनावणी झाली. यावेळी नीट यूजी 2024  मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं सुनावणी दरम्यान दिली आहे. तसेच निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांचं काऊन्सिलिंग, प्रवेश प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचंही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळे आता ग्रेस गुण देण्यात आलेल्या 1563 विद्यार्थ्यांचे गुण रद्द करत त्यांची पुन्हा परीक्षा 23 जून रोजी घेतली जाणार असून 30 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

कोर्टात काय झाला युक्तीवाद?

युक्तीवादादरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने 1500 हून अधिक विद्यार्थांची पुनर्परीक्षा घेण्याचे सुचवण्यात आले आहे. तसेच संबंधित विद्यार्थांनी पुन्हा परीक्षा न दिल्यास त्यांचे ग्रेस गुण रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या 1,563 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहे त्यांना 23 जून रोजी पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय दिला जाईल आणि त्याचा निकाल 30 जून रोजी लागेल. एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 6 जुलैपासून समुपदेशन सुरू होईल असेही केंद्राने न्यायालयात सांगितले. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, परीक्षेतील हेराफेरीचे आरोप पाहता, ती रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेसह सर्व अर्जांवर ८ जुलै रोजी सुनावणी घेण्यात येईल.

NEET UG Exam 2024 : ‘नीट’ परीक्षा पुन्हा होणार? काय आहे सगळा वाद? समजून घ्या संपूर्ण प्रकरण…

विद्यार्थ्यांची मागणी काय?
नीट परिक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत समुपदेशनावर बंदी आणून पेपर पुन्हा घेण्यात यावेत अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे. NEET UG-2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच 67 विद्यार्थी टॉपर झाल्याचे समोर आले होते. NEET परीक्षेच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रेस मार्क्स, पुनर्परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर आज (13 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दिल्ली हायकोर्टात काल (12 जून) NEET परीक्षेबाबतही सुनावणी झाली.

follow us