Download App

नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग; जीव वाचविण्यासाठी चालत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या

  • Written By: Last Updated:

New Delhi-Darbhanga Train : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात नवी दिल्ली-दरभंगा (02570) एक्स्प्रेसच्या (New Delhi-Darbhanga) बोगीत भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. इटावाजवळील सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली आहे. या भीषण आगीमुळं बोगी पूर्णपणे जळून राख झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती आहे. यावेळी प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला. (New Delhi-Darbhanga Express caught fire in Uttar Pradesh’s Etawah district)

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी इटावामध्ये धावणाऱ्या नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसमध्ये आग लागली. ही ट्रेन इटावाहून नवी दिल्लीसाठी निघाली होती. दरम्यान, या भीषण आगीत तीन डब्बे पूर्णपणे जळाले. चालत्या ट्रेनमधून धूर निघत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या. सायंकाळी 6 वाजता सराई भूपत रेल्वे स्थानकाजवळ ही घटना झाला. त्या वेळी ट्रेनचा वेग ताशी 20 ते 30 किमी दरम्यान होता असे सांगितले जाते.

बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांची चौथ्या दिवशीही मृत्यूशी झुंज; विशेष विमानाने महाकाय मशीन दाखल

ट्रेन सराय भूपत स्थानकाकडे जात असताना स्टेशन मास्टरला स्लीपर कोचमध्ये धूर दिसला. स्टेशन मास्तरच्या वॉकीटॉकीच्या मदतीने ट्रेन चालक आणि गार्डला माहिती दिली. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि वीज प्रवाहही बंद करण्यात आला. यानंतर स्लिपर कोचमधील प्रवासी खाली उतरले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात दोन प्रवासी भाजले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजूनही ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. या आगीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आग किती भीषण आहे हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, महिलेने मारली ताफ्यासमोरच उडी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

भारतीय रेल्वे अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी भागलपूरहून समस्तीपूरच्या जयनगरला जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. यामध्ये एक महिला रेल्वे प्रवासी आणि इतर काही प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी आरपीएफ पथकाने एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहे.

Tags

follow us