Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्ताचा मृत्यू झाला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसून आल्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 4 चित्ता आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे.
आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निगराणी पथकाला तेजस या नर चित्ताच्या मानेच्या वरच्या भागावर जखमेच्या खुणा दिसल्या. मॉनिटरिंग टीमने पालपूर मुख्यालयात उपस्थित असलेल्या प्राण्यांच्या डॉक्टरांना ही माहिती दिली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन तेजस चित्ताची तपासणी केली असता जखम गंभीर असल्याचे दिसून आले. यानंतर तेजसला बेशुद्ध करून उपचारासाठी पाठवण्यात आले.
ब्रृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचारासह ‘या’ गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल
चित्ता मृतावस्थेत आढळून आला
घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांना दुपारी दोनच्या सुमारास नर चित्ता तेजस मृतावस्थेत आढळून आला. सध्या चित्ता तेजसला झालेल्या दुखापतींबाबत तपास सुरू आहे. यासोबतच चित्ताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ड्रायव्हर होणार ठंडा-ठंडा कूल-कूल! ट्रक केबिनमध्ये येणार एसी, केंद्र सरकारची घोषणा
कुनो नॅशनल पार्कमधून गेल्या दोन महिन्यांत 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सिया (ज्वाला) चित्ताने 24 मार्च रोजी 4 शावकांना जन्म दिला होता, मात्र आतापर्यंत यातील तीन शावकांचा मृत्यू झाला आहे. आता कुनो पार्कमध्ये 16 प्रौढ चित्ता आणि 1 शावक आहे. वन्यजीव तज्ज्ञांनीही वारंवार होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे.