Fake Note : देशात बनावट नोटांचा (fake notes) सुळसुळाट सुरूच असल्यानं बनावट नोटांचं रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) आज देशभरात छापेमारी केली. तपास संस्थेने चार राज्यांमध्ये छापे टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये झालेल्या कारवाईत 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांसह प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट जप्त करण्यात आले.
भाजपच्या राशीला भूपेश बघेलांची टक्कर, जाणून घ्या काय म्हणते ग्रहांची चाल
गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबरला नोंदवलेल्या एका प्रकरणाच्या अनुषंगाने एजन्सीने ही छापेमारी केली. या कारवाईबाबत उत्तर प्रदेशातील शाहजहामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुधीर जयस्वाल म्हणाले की, बेंगळुरू येथून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंग याला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन फोन जप्त करण्यात आले आहेत. बनावट नोटा बनवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
टोपे-लोणीकर वाद विकोपाला! आता बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक
एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील आरोपी राहुल पाटील उर्फ जावेद, उत्तर प्रदेशातील शाहजहामपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंग आणि कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र, महाराष्ट्राच्या यवतमाळमधील संशयित शिवा पाटील, बिहारचा रोहतास जिल्ह्यातील शशी भूषण या सर्वांच्या घरांची झडती घेतली.
या छाप्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने बनावट नोटा जप्त केल्या आहेत. विवेक ठाकूरच्या घरातून 6600 रुपये (500, 200 आणि 100 रुपये) नोटा छापण्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य सापडले आहे. शिवा पाटील हा सीमेला लागून असलेल्या देशातून बनावट नोटा छापण्याच्या वस्तू खरेदी करायचा, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
राहुल तानाजी पाटील याने बनावट नोटा पुरवण्याचे आश्वासन देऊन पैसे गोळा करण्यासाठी बनावट सिमकार्डचा वापर केल्याचे एआयए तपासात उघड झाले आहे. याशिवाय नोटा छापण्यासाठी लागणारा प्रिंटरही महेंद्रच्या घरात सापडला. यंत्रणेने लगेच प्रिंटर जप्त केला.