Download App

‘नियोजित वेळेआधी होणार लोकसभा निवडणूक, यंदा वर्षाच्या….’; नितीश कुमार यांचे वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Nitish Kumar : येणारं वर्ष हे निवडणुकांच वर्ष असून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पुढाकार घेत आहेत. या अंतर्गत 23 जून रोजी विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा निवडणूका नियोजित वेळेपूर्वी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Nitish Kumar said Lok Sabha elections can be held only by the end of the year)

नितीशकुमार यांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या वेळी ते म्हणाले की, पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होईलच असं नाही, कारण, या वर्षाच्या अखेरीसही निवडणुका होऊ शकतात, असं सांगितलं.

Uniform Civil Law Updates : मोदी सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; येत्या 30 तारखेपर्यंत… 

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच प्रमुख पक्षांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली. आहे. भाजप कधीही निडणुकीच्या तयारीत असते. आता तर भाजपने निवडणुक प्रभारींच्या मतदार संघनिहाय याद्याही जाहीर केल्या. तर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आगामी निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस संघटनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली. आतापासूनच लोकसभेचे वारे वाहू लागले.

दरम्यान, ग्रामीण बांधकाम विभागाच्या योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, आम्ही आधीच सांगतोय की घाई करा. कामे जितक्या लवकर करता येईल तितकं चांगलं आहे. कारण, कधी निवडणूका होतील, कुणास ठाऊक काय? पुढच्या वर्षीच निवडणूक व्हावी, असं काही आवश्यक नाही. नियोजित वेळेपूर्वी देखील निवडणुका होऊ शकतात, त्यामुळे त्वरीत काम करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

 

 

Tags

follow us