Download App

Mission Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी सीमा हैदरनं ठेवलं व्रत; देवाला प्रार्थना करतानाचा व्हिडिओ आला समोर

Mission Chandrayaan-3 : ‘चांद्रयान 3’ च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरातील प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करत आहे. मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हवन सुरु आहेत. मशिदींमध्ये चांद्रयानासाठी प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर यांनीही चांद्रयानच्या यशासाठी व्रत ठेवलं ठेवला आहे. सीमा हैदरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सीमाने म्हटलेय की, ‘चांद्रयान 3’ त्याच्या इच्छित स्थानावर म्हणजेच चंद्रावर उतरेपर्यंत उपवास ठेवणार आहे. सीमा हैदरने चांद्रयान यशस्वीपणे उतरेपर्यंत आपले उपोषण सुरुच राहणार, असल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

New Education Policy नुसार आता वर्षातून दोनदा होणार बोर्ड परिक्षा; शिक्षण मंत्रालयाची माहिती

आपल्या भारत देशाची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करत असल्याचे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चांद्रयानच्या यशामुळे माझ्या भारत देशाचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल होईल. यासाठी राधे-कृष्णाकडे देव-देवतांकडे प्रार्थना करत असल्याचे तीने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत करत आहेत. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यास संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण होणार आहे. माझा भारत देश जगात सर्वात पुढे असावा यासाठी प्रार्थना करत असल्याचेही सीमाने म्हटले आहे.

Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’

दोन दिवसांपूर्वी सीमा हैदरने हरितालिका तीज आणि नागपंचमीचा सण तिच्या कुटुंबासोबत साजरा केला. याचा व्हिडिओ तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सीमा हैदरने सांगितले की, सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर ती पूर्ण हिंदू झाली आहे. हिंदू सण साजरे करते. सीमा या वर्षी मे महिन्यात तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरला सोडून नोएडाला राहायला गेली होती.

गुलाम तीन वर्षांपूर्वीच त्यांना सोडून गेल्याचे तीचे म्हणणे आहे. सीमा आणि गुलामला चार मुलं आहेत. दरम्यान, गुलाम हैदरने आपण तिसरे लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. यावर सीमाने आपल्याला काही फरक पडत नसल्याचेही सांगितले आहे.

Tags

follow us