Now Standing is Compulsory for Vande Mataram as like the national anthem : राष्ट्रगीत कानावर पडले की, आहे त्या स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे लागते. अन्यथा तो राष्ट्रगीताचा अवमान मानवा जातो. त्याचप्रमाणे आता वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार आहे. तसा नियम देखील केंद्र सरकारकडून लवकरच आणला जाणार आहे.
मोठी बातमी! मुंबई मनपा महापौर पदाची निवडणूक लांबणीवर, कारणही आले समोर…
त्यासाठी भाजप सरकार राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या सन्मानासाठी एक नियम आणण्याची तयार करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला गृहमंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे भारताचे संविधानानुसार राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या दोन्हींना देखील समान सन्मान मिळायला हवा मात्र कायदा आणि नियमानुसार या दोन्हींमध्ये बराच फरक आहे
PIFF मध्ये ‘तो ती आणि फुजी’ची छाप! सर्वोत्कृष्ट पटकथा आणि अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला
ज्याप्रमाणे राष्ट्रीय सन्मान अवमान निवारण अधिनियम 1971 नुसार राष्ट्रगीत सुरू असताना उभ राहणं बंधनकारक आहे. अन्यथा त्यासाठी शिक्षा देखील होऊ शकते मात्र तसा कोणताही लिखित नियम राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमसाठी करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रगीत कानावर पडले की, आहे त्या स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे लागते. अन्यथा तो राष्ट्रगीताचा अवमान मानला जातो. त्याचप्रमाणे आता वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार आहे. तसा नियम देखील केंद्र सरकारकडून लवकरच आणला जाणार आहे.
अभिमानास्पद! राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत कोपरगावची शाळा दिल्लीतील महाअंतिम फेरीत दाखल
भाजप सरकारकडून देशभरामध्ये वंदे मातरम वर्ष साजरं करत होत त्या पार्श्वभूमीवर अनेकदा भाजपकडून कॉ्ंग्रेसवर राजकीय तुष्टीकरणासाठी वंदे मातरमचं महत्त्व कमी केल्याचा आरोप संसदेमध्ये आणि संसदेबाहेर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता सरकारने नवा नियम आणण्याची तयारी सुरू केली आहे.
वादाचं कारण नेमकं काय?
कॉ्ंग्रेस अधिवेशन 1937 मध्ये वंदे मातरमच्या काही कडव्यांना हटवण्यात आलं होतं. त्यावरून भाजपने ही फुट पाडण्याची रणनीती असल्याचा आरोप केला होता. त्यावर कॉ्ंग्रेसने भाजप इतिहासाशी छेडछाड करत असल्याची टीका केली. गेल्या काही वर्षात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये वंदे मातरमसाठी देखील राष्ट्रगीताप्रमाणे नियम केला जावा.
त्यावर केंद्र सरकारने 2022 सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं होतं की, आतापर्यंत राष्ट्रीय गीतासाठी कोणताही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. बंकिम चंद्र चटर्जी (चट्टोपाध्याय) यांनी लिहीलेल्या वंदे मातरम या स्वदेशी आंदोलना दरम्यान स्वातंत्र्याचा मोठा नारा दिला होता. सरकार आता तोच सन्मान पुन्हा या गीताला देऊ इच्छित आहे.
