Pin Not Required For Payments Upto Rs. 500 On UPI Lite : RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सर्व सामान्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. RBI च्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा UPI पेमेंट करणाऱ्या युजर्सना होणार असून, 500 रूपयांपर्यंतच्या कोणत्याही पेमेंटसाठी येथून पुढे युजर्स पिनशिवाय पेमेंट करू शकणार आहेत, अशी माहिती आरबीआयचे गवर्नर शक्तीकांता दास यांनी गुरूवारी (दि. 10) सांगितले.
खान्देशातील बडा नेता भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर; पवारांची साथ सोडलेला माजी आमदार करणार प्रवेश?
दास म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI Lite ची व्यवहार मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवली असून, यामुळे आता UPI lite वापरून 500 रुपयांपर्यंत पिनशिवाय कोणतेही पेमेंट करणे शक्य होणार आहे. दुसरीकडे, सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ऑफलाइन पेमेंट मोडचा फायदा केवळ रिटेल क्षेत्र डिजिटली सक्षम करण्यास नव्हे तर, इंटरनेट/टेलिकॉम कनेक्टिव्हिटी कमकुवत असतानाही किंवा उपलब्ध नसतानाही अल्प रकमेचे पेमेंट करणे शक्य होणार आहे.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
AI आधारित व्यवहारही सुरू होणार
पिनशिवाय पेमेंट करण्याबरोबरच लवकरच UPI वर AI आधारित पेमेंट सर्व्हिस सुरू केली जाणार आहे. याबाबत आरबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, वापरकर्ते याद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI आधारित प्रणालीशी व्यवहारासाठी संवाद साधू शकतील. हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहणार असून, हा पर्याय लवकरच स्मार्टफोन आणि फीचर फोन आधारित UPI प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
या सर्वांबाबात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (NPCI) लवकरच सूचना जारी केल्या जातील असेही दास आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “संवादात्मक पेमेंट्स” ची अंमलबजावणी सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल, त्यानंतर इतर भारतीय भाषांमध्ये याचा विस्तार करण्याच्या योजना असल्याचे दास यांनी सांगितले.
रेपोरेटमध्ये कोणताही बदल नाही
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने आज (दि. 10) एकमताने रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कर्जदारांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. मात्र, या निर्णयामुळे बँकांकडून स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे. आरबीआयचे लक्ष महागाई कमी करण्यावर असून, देशाची आर्थिकस्थिती मजबूत स्थितीत आहे. महागाईचा रेट आरबीआयच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असला तरी, ती कमी करण्यास आरबीआय कटीबद्ध असल्याचे दास यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळाच महागाईचा दर वाढण्याची शक्यताही दास यांनी यावेळी व्यक्त केली.