NSE जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टॉक एक्सचेंज; लंडनला टाकले मागे

भारतीय नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) बाजार भांडवलाच्या बाबतीत लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे. जाणून घ्या NSE चे बाजारमूल्य आणि जागतिक क्रमवारी.

NSE

NSE

NSE becomes the world’s third-largest stock exchange: मार्केट कॅपच्या बाबतीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा स्टॉक एक्सचेंज बनण्याचा मान एनएसईला मिळाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने हे कसे साध्य केलंय. या स्टॉक एक्सचेंजचा मार्केट कॅप किती आहे हे लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया…


जिल्हा बँक निवडणूक : साताऱ्यात जमलं नाही ते जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये करून दाखवलं…

जगातील आघाडीच्या एक्सचेंजमध्ये NSE ची झेप
लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुपच्या आकडेवारीनुसार, NSE चे बाजार भांडवल सुमारे 5.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर लंडन स्टॉक एक्सचेंजचे बाजारमूल्य जवळपास 5.77 लाख कोटी रुपये आहे. यामुळे बाजार भांडवलाच्या बाबतीत NSE ने लंडन एक्सचेंजला मागे टाकले आहे. NSE ने जर्मनीच्या ड्यूश बोर्स एजीला देखील मागे टाकले आहे. ड्यूश बोर्सचे बाजार भांडवल सुमारे 5.9 लाख कोटी रुपये म्हणजेच 63.4 अब्ज डॉलर आहे.

तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो! रोहित पवारांचा भाजपसोबत जाण्यास विरोध, वेगळी वाट धरण्याचे संकेत

जागतिक बाजार भांडवलाच्या क्रमवारीत NSE च्या पुढे आता केवळ दोन एक्सचेंज आहेत. शिकागोस्थित CME ग्रुप सुमारे 10.49 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE) जवळपास 9.34 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या क्रमाकांपवर आहे.

NSE च्या शेअरमध्येही मोठी तेजी
NSE च्या या जागतिक कामगिरीमागे कंपनीच्या शेअरमध्ये झालेली जोरदार वाढ देखील महत्त्वाची ठरलीय. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत झालेल्या 18 पैकी 14 ट्रेडिंग सत्रांमध्ये NSE च्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. या तेजीमुळे शेअरने 2,400 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. याआधी ऑक्टोबर महिन्यातही NSE च्या शेअरमध्ये जवळपास 34 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. शेअरच्या सातत्यपूर्ण तेजीमुळे NSE च्या बाजारमूल्यात मोठी भर पडली आहे.

भारतीय बाजारपेठेची जागतिक ताकद अधोरेखित
NSE ने लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकणे ही भारतीय वित्तीय बाजारपेठेच्या वाढत्या जागतिक प्रभावाची महत्त्वाची खूण मानली जात आहे. गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, शेअर बाजारातील व्यवहारांची वाढ आणि भारतीय बाजारपेठेचे विस्तारलेले स्वरूप यामुळे NSE ची जागतिक पातळीवरील स्थिती मजबूत होत आहे. मात्र, एक्सचेंजची जागतिक क्रमवारी ही त्यांच्या बाजारमूल्यातील चढ-उतारांवर अवलंबून असते. त्यामुळे शेअर्सच्या किमतीत होणाऱ्या बदलांनुसार ही क्रमवारी भविष्यात बदलू शकते.

Exit mobile version