NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे.
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO), launches its advanced navigation satellite GSLV-F12 and NVS-01 from Sriharikota.
(Video: ISRO) pic.twitter.com/2ylZ8giW8U
— ANI (@ANI) May 29, 2023
विशेष म्हणजे रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च करणारा भारत पहिला देश आहे. अंतराळात चार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट आहेत. दरम्यान भारताचं रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट तामिळनाडूतील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून लॉन्च करण्यात आलं. रॉकेट जीएसएलव्हीने हे सॅटेलाईट अंतराळात नेलं. रॉकेट जीएसएलव्हीची ही 15 वी अंतराळ यात्रा आहे.
Malaika Arora: मलायकानं अर्जुनसोबतच ‘तो’ फोटो केला शेअर; म्हणाली, ‘लेजी बॉय…’
हे सॅटेलाईट रिअल टाईम जिओपोजिशनिंग आणि टायमिंग सर्विसेस देणार आहे. तर या सॅटेलाईटला ‘एनवीएस-01’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याचं वजन 2,232 किलो आहे. इस्त्रोने सांगितलं की, एनवीएस-01 च्या नेविगेशन पेलोड्समध्ये एल1, एल5 आणि एस बॅंड समाविष्ट आहे. ज्यामध्ये पूर्वीच्या सॅटेलाईटच्या तुलनेत देशात विकसित रुबिडियम परमाणु घड्याळ लावण्यात आलं आहे. अगोदर भारत इंपोर्टेड रुबिडियम परमाणु घड्याळाचा वापर करत होता.
HSC : बारावी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; पुरवणी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
जीएसएलवी या सॅटेलाईटला ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये सोडेल तर नंतर ऑनबोर्ड मोटर्सच्या मदतीने पुढे पाठवणार आहे. भारताने स्पेसमध्ये नेव्हिगेशन विंद इंडियन कंसल्टेशन सर्विसेज बसवले आहे. जी भारताचं एक रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम आहे. ती जीपीएस प्रमाणे काम करते. भारत आणि आसपासच्या 1500 किलोमीटर क्षेत्राला ती कव्हर करते.
या सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या रिअल टाईम जिओपोजिशनिंग आणि टायमिंग या सेवांचा उपयोग विशेषतः सिव्हिल नेव्हिगेशन आणि मिलिट्रीच्या गरजांनुसार करण्यात येणार आहे. तसेच मोबाईलवर मिळणाऱ्या लोकेशन सर्विसेस देखील याच सॅटेलाईटवरून मिळतात.