Crime :
गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. येथील ब्रिजभूषण पांडे यांचे लखीमपूर येथील एका तरुणीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झाले. जोखू नावाच्या व्यक्तीने त्यांचे लग्न लावून दिले होते. (On the fifth day of the wedding, the newlyweds knocked the in-laws unconscious and stole money worth lakhs)
मात्र 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणातून औषध मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केले. त्यानंतर तिने घरातील सर्व सामानासह पळ काढला. या घटनेपूर्वी वधूसोबत चार जण सासरच्या घरी दाखल झाले होते. यात एक महिलाही नववधूची बहीण म्हणून आली होती. यानंतर सासरच्या मंडळींच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
तपासासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. यात काल (26 डिसेंबर) रात्री उशीरा नववधू आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. तसेच चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान नववधू आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.