Download App

Onion Minimum Export Price: कांदा करणार वांदा ! निर्यात शुल्कामध्ये मोठी वाढ

  • Written By: Last Updated:

Onion Minimum Export Price: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या किंमती वाढू लागल्या आहेत. या किंमतीला लगाम लागण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने किमान निर्यात शुल्कामध्ये (Onion Minimum Export Price) टनामागे आठशे डॉलरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. केंद्राने काही महिन्यांपूर्वीच निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावले होते. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले होते. परंतु आता पुन्हा निर्यात शुल्क वाढविले आहे. देशातील कांदा महाग (Onion Price) होत आहे. त्यात राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड, मिझोराम या महत्त्वाच्या राज्यांचा विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

जरांगेंचा सरकारवर दबाव, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; रामदार तडस यांचा इशारा

कांदा उत्पादक राज्यात महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. परंतु या वर्षी कांदा उत्पादन घटले आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्यांच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. तसेच खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कांदाही यंदा काही भागात नाहीत. त्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे कांदाचा बाजारभाव वाढू लागला आहे. सध्या नाशिक व नगरमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भावही वेगाने वाढू लागले आहेत. सध्या चार ते पाच हजार रुपये क्विंटलने कांदा विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात हा कांदा 60 ते 70 रुपये किलो दर आहे.

गद्दारीचा शिक्का जाणार नाही, सगळ्यांना साफ करतो अन् खरी शिवसेना दाखवतो; ठाकरेंची भाजप-शिंदे गटावर टीका

कांदा शंभर रुपये किलो होणार
जुना कांद्याचा साठा कमी आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये कांद्याच्या किंमती भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे. देशात कांदा शंभर रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापारी सांगत आहेत. उर्वरित कांदाही परदेशात जाऊ नये, भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राने हे मोठे पाऊल उचलले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात कांदा व्यापारी व शेतकरी हे आक्रमक होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादकांनी नुकसान सहन करून कांदा साठवून ठेवलेला आहे.

Tags

follow us