Download App

गद्दारीचा शिक्का जाणार नाही, सगळ्यांना साफ करतो अन् खरी शिवसेना दाखवतो; ठाकरेंची भाजप-शिंदे गटावर टीका

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray speech in shivsainik sammelan : आजपर्यंत शिवसेनेच्या (Shiv Sena) जोरावर जे मोठे झाले, ते शिवसेना संपवालया निघाले. पण, शिवसेनेची खरी ताकत तुम्हाला कळली नाही. तुम्ही फक्त वरवरचा फेस घेऊन गेला. मात्र, मुळं अजूनही घट्ट आहेत. तुम्ही शिवसेनेला संपलायला निघालात. मात्र सगळ्यांना साफ करतो आणि खरी शिवसेना दाखवितो, असा इशारा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला दिला.

कझाकस्तानमध्ये पोलाद खाणीला आग; 32 जणांचा मृत्यू, बेपत्ता लोकांचा शोध सुरु 

आज उबाठाच्या वतीने मुंबई व उपनगर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संबोधित करतांना ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, आज भाजप सेनेला संपवायला निघाली आहे. शिवसेनेला संपवायला भाजप उभी आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचं त्यांनी खुलाल जा… शिवनेनेच्या जोरावर जे मोठे झाले, ते शिवसेना संपवालया निघाले. पण, तुम्ही फक्त वरचा फेस घेऊन गेला. मात्र, मुळं अजूनही घट्ट आहेत, असं ठाकरे म्हणाले.

अडीच वर्ष शिनेसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपना मुख्यमंत्री असं ठरलं होतं. शिवसेनेनं युती तोडली असं भाजप सांगत असतं. मात्र, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी सगळा खुलासा केला. खडसेंना पुढं करून भाजपनेच युती तोडली. एकेदिवशी एकनाथ खडसेंचा फोन आला आणि त्यांनी आता आपलं जमणार नाही, असं सांगितलं. मांजरामध्ये वाघाच्या गळ्यात घंटा बांधायची हिंमत नाही, म्हमून ती जबाबदारी भाजपने खडसेंवर सोपवली, असा टोलाही त्यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला.

शिवसेना कॉंग्रेससोबत गेल्यानं सेनेची कॉंग्रेस झाली, अशी टीका केली जाते. पण, शिवसेना भाजपसोबत तीस वर्ष होती. मग शिवसेनेची भाजपा झाली का? असा सवाल करत हा नेभळटपणा मला बाळासाहेबांनी शिकवला नाही, असंही ठाकरेंनी ठणकावलं.

2014 ला युती ला संपवालाय निघाले, 2019 ला गद्दारी करून युती तोडली. शिवसेना संपवायला तुमच्या सात पिढ्या उतरल्या पाहिजेत. हिंदुत्वाचं पेंटंट भाजपचं नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर पहिल्यांदा बाळासाहेबांनी निवडणूक जिंकली, असं ठाकरे म्हणाले

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेना तोडली असा घणाघातही ठाकरेंनी केला. मुंबई तोडण्याचा डावा सुरू झाला आहे. मात्र, मुंबई काय आंदण म्हणून मिळालेली नाही महाराष्ट्राला. लढा देऊन जिंकली आहे. मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे करू, असंही ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी शिंदे गटावरही सडकून टीका केली. सत्तेत बसलेल्यांना आपण काय करतोय, तेच कळत नाही. आपल्या आईशी ते गद्दारी करत आहे. त्यांच्या कपाळावरच गद्दारीचीा शिक्का सात पिढ्या पुसल्या जाणार नाही, अशी टीका ठाकरेंनी केली.

Tags

follow us