कझाकस्तानमध्ये पोलाद खाणीला आग; 32 जणांचा मृत्यू, बेपत्ता लोकांचा शोध सुरु
Kazakhstan Mine Fire: कझाकस्तानमधील आर्सेलरमित्तल या जागतिक पोलाद कंपनीच्या खाणीत लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कझाकस्तान सरकारने कंपनीसोबतचा गुंतवणूक करार संपवण्याचा आदेश दिला आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कोस्टयेन्को खाणीत 32 लोकांचे मृतदेह सापडले होते, 18 लोक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कंपनी लक्झेंबर्गमध्ये स्टील उत्पादकाचे स्थानिक युनिट आहे. या बद्दल कझाकस्तानचे अध्यक्ष कॅसिम-जोमार्ट टोकायेव म्हणाले की स्टील कंपनी आर्सेलरमित्तल आमच्या इतिहासातील सर्वात खराब कंपनी आहे. टोकायेव यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच 29 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपतींनी त्यांच्या मंत्रिमंडळाला आर्सेलरमित्तल तेमिरटौसोबतची गुंतवणूक थांबवण्याचे आदेश दिले.
18 जण अद्याप बेपत्ता
या दुर्घटनेनंतर खाण चालकाने सांगितले की, मिथेनच्या स्फोटानंतर 252 पैकी 206 जणांना खाणीतून बाहेर काढण्यात आले, 18 जण गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 18 लोकांचा शोध लागला नव्हता.
गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह
दोन महिन्यांतील ही दुसरी घटना
कझाकस्तानमधील आर्सेलरमित्तलच्या साइटवर दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. याआधी ऑगस्टमध्ये याच भागातील खाणीत झालेल्या अपघातात पाच खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. कझाकस्तानच्या अध्यक्षांनी घटनेनंतर लगेचच एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारला आर्सेलरमित्तलसोबतचे गुंतवणूक सहकार्य संपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकारचे आपत्कालीन मंत्री सिरिम शारीपखानोव यांनी सांगितले की, या अपघातामागील कारण तपासले जात आहे.