Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

Cash For Query : संसदेच्या राजकारणात सध्या तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे क्वॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरण चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी भाजपा खासदार या प्रकरणात आक्रमक झालेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचे मोईत्रा यांनी अखेर मान्य केले आहे. इतकेच नाही तर हिरानंदानी यांच्याकडून भेट स्वरुपात मेकअप साहित्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांवर इंडिया टुडेने घेतलेल्या मुलाखतीत हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचे आरोप फेटाळून लावले. हिरानंदानी यांची उलटतपासणी करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणीही मोईत्रा यांनी केली. मी माझा लॉगइन आयडी आणि पासवर्ड आणखीही काही जणांना दिला आहे कारण, मी कामकाजात खूप व्यस्त असते. मात्र,प्रश्न टाइप केल्यानंतर प्रत्येक वेळी मला पाठवले जातात. मी प्रश्न वाचते. प्रश्न टाइप केल्यानंतर माझ्या मोबाइलवर ओटीपी येतो मी ओटीपी त्यांना देते. त्यानंतर या प्रश्नाची नोंदणी होते, असे मोईत्रा म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; राहत्या घरातून वनमंत्र्यांना अटक

भाजप खासदाराने थेट नियमच सांगितले 

मोईत्रा यांनी दावा केला की, सरकारी आणि संसदीय वेबसाइट चालविणाऱ्या एनआयसीचे कोणतेही नियम नाहीत. मात्र, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या दाव्यावर आक्षेप घेत थेट एनआयसीचे नियम आणि एक अर्ज पोस्ट केला. हा अर्ज प्रत्येक खासदाराला भरणे बंधनकारक आहे. दुबे यांच्या या कार्यवाहीनंतर मोईत्रा यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोईत्रा वापरतात हिरानंदांनींची कार 

मोईत्रा म्हणाल्या, दर्शन हिरानंदानी यांच्याकडून काही गोष्ट घेतल्या कारण ते जवळचे मित्र आहेत. वाढदिवसानिमित्त हिरानंदानी यांनी त्यांना मेकअप साहित्य भेट दिल्या होते. हे साहित्य दुबईहून आणण्यात आले होते. घरातील इंटिरिअर बदलण्यासाठी हिरानंदानी यांच्याशी चर्चा केल्याचेही मोईत्रा यांनी सांगितले. परंतु, यावर जो खर्च झाला तो सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सीपीडब्ल्यूडीने केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी मला बंगल्याचे वितरण केले गेले तेव्हा या घराची स्थिती अतिशय खराब होती. त्यामुळे घराची दुरुस्ती करण्यासाठी हिरानंदानी यांच्याशी चर्चा केली होती, असे मोईत्रा म्हणाल्या. ज्यावेळी मी मुंबईत असते तेव्हा हिरानंदानी यांचीच कार वापरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Priyanka Gandhi : PM मोदींवरील टीका भोवली; निवडणूक आयोगाने प्रियंका गांधींना धाडली नोटीस

पैसे दिले जात असतील तर पुरावे द्या 

एका प्रश्नाच्या उत्तरात मोईत्रा म्हणाल्या, मी हिरानंदानी यांना विनंती करते त्यांनी येथे येऊन स्पष्टपणे सांगावे की त्यांनी मला आणखी काय दिले आहे. कुणी कुणावर काहीही आरोप करू शकतो त्याला काहीच मर्यादा नाही. मात्र आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी नेहमीच तक्रारदाराची असते. मला दोन कोटी रुपये दिल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात कुठेही आढळलेला नाही. जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube