Download App

Onion Price Crisis : ‘मी कृषीमंत्री होतो पण कांदा निर्यातीवर..,’; शिंदेंच्या टोल्यावर शरद पवारांचं सणसणीत प्रत्त्युत्तर

Onion Price Crisis : मी कृषीमंत्री होतो पण कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावलं नसल्याचं सणसणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा खरेदी करण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधत खोचक टीका केली होती. त्यानंतर आता शरद पवारांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे.

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने बच्चू कडू आक्रमक, ‘सरकारने नालायकपणा करु नये’

शरद पवार म्हणाले, मी कृषिमंत्री असताना कांदा निर्यातीत 40 टक्के शुल्क लावलं नाही. केंद्र सरकारने आज कांदा निर्यातीमध्ये जे शुल्क आकारलं आहे ते त्यांनी मागे घ्यावंं, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच आता केंद्र सरकारने निर्यात शुल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आज केंद्राने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Pune : पतीचे कोरोनात निधन; अल्पवयीन पुतण्यावर दीड वर्षांपासून काकीची जबरदस्ती

केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये दराने खरेदी करण्याच निर्णय घेतला आहे. त्यावरही शरद पवारांनी बोट ठेवत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, कांद्याला 2410 रुपयांचा भाव केंद्राने दिला आहे, यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही, हा कांदा टिकणारा आहे म्हणूनच शेतकरी थांबायला तयार झाले आहेत, आता केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…

मुख्यमंत्री काय म्हणाले?
कांदा खरेदीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं नूकसान होऊ नये, म्हणून कांद्याला 2410 रुपयेचा दर केंद्राने दिला आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, तेही 10 वर्ष कृषिमंत्री राहिलेत, त्यांच्या काळातही अशी परिस्थिती होती, पण असा निर्णय घेण्यात आला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना टोलेबाजी लगावली आहे. एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही आधी शरद पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले? याची माहिती अजित पवारांकडून घ्यायला हवी होती. तुम्ही माहिती घेतली असती तर हे वक्तव्य केलंच नसतं, या शब्दांत रोहित पवारांनी समाचार घेतला होता.

Tags

follow us