Pune : पतीचे कोरोनात निधन; अल्पवयीन पुतण्यावर दीड वर्षांपासून काकीची जबरदस्ती

Pune : पतीचे कोरोनात निधन; अल्पवयीन पुतण्यावर दीड वर्षांपासून काकीची जबरदस्ती

पुणे : येथील अल्पवयीन मुलासोबत त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या महिलेने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान अशा दीड वर्षांच्या काळात हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधित महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप तपास सुरु असून तिला अटक करण्यात आलेली नाही. (A aunty kept forced physical relations with a minor nephew)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन तरुण (17) आणि आरोपी महिला (28) कोंढवा परिसरात दोघांचीही घरे शेजारी आहेत. दोघांची आडनाव एक सारखीच असून नात्याने संबंधित महिला पीडित मुलाची काकीच लागते. या महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले आहे. त्यानंतर तिने पीडित तरुणाला कामाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलविण्यास सुरुवात केली.

Pune Crime : ज्योतिषाकडून मुहूर्त काढत बारामतीत 1 कोटींचा दरोडा; चार महिन्यानंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

घरी बोलविण्याचे प्रमाण वाढवत त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी तरुणाची इच्छा नसतानाही त्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच, तसेच फिर्यादी मुलालाच शरीरसंबंध ठेवत असतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास भाग पाडले. त्याआधारे जबरदस्ती केल्याची तक्रार करण्याची देण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

“जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतीय…” वासनांध तरुणाचा सोसायटीतील 140 जणांना मेल

याबाबत संबंधित मुलाच्या काकाला मुलाच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ दिसून येताच संबंधित महिलेला ताकीद देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान अशा दीड वर्षांच्या काळात हा प्रकार सुरु होता. दरम्यान, बुधवारी (21 ऑगस्ट) पुन्हा एकदा काकांना मुलाच्या फोनमध्ये अशाप्रकारचे व्हिडीओ दिसून आले आणि हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर पीडित अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली आणि संबंधित महिलेविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात अद्याप तपास सुरु असून महिलेला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस अधिकारी पुजा पाटील या करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube