“जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतीय…” वासनांध तरुणाचा सोसायटीतील 140 जणांना मेल

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 17T131431.030

पुणे : शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत या तरूणाने सोसायटीतील 140 सदस्यांना मेल पाठवला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फोटोवरून राजकारण तापलं; काका-पुतण्याच्या वादात राऊतांनी राज ठाकरेंनाही ओढलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात असणाऱ्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या शेखर धोत्रे याने सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सदस्याच्या पत्नीबाबत मेल केला. यात त्याने “जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, आज चालायला आली नाही का”, असा मजकूर असलेला ई- मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून दिला.

ही बाब संबंधित पीडितेला आणि तिच्या पतीला समजल्यानंतर याबाबत ते धोत्रे याला जाब विचारण्यास गेले असता आरोपीने धमकी देत जे करायचं ते करा असे म्हटले. त्यानंतर याबाबत पीडित दाम्पत्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, धोत्रे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PM Vishwakarma Yojana : कारागिरांसाठी मोदी सरकारने आणले ‘अच्छे दिन’; जाणून घ्या योजना

दरम्यान, तक्रारदार महिलेच्या पतीसह झालेल्या वादानंतर आरोपीने बदला घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारची घटना एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडल्याने सोसायट्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मोठ्या व्यक्तीच असे वागत असतील तर, मुलांनी नेमकं कसं वागायचं असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us