Operation Sindoor : अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जवाब दिला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. (Sindoor) त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केलं आहे.
भारताची गुप्तचर यंत्रणा (RAW)ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुठल्या-कुठल्या ठिाकणी हे स्ट्राइक केले? आणि ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत? बहावलपुर हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.
Live : ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला; वाचा, मिनिट टू मिनिट काय घडलं?
मुरीदके हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता. तर गुलपुर हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.
लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.
बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.
कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.
बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.
मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.