Download App

Padma Awards : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील उदय देशपांडेंना पद्मश्री, पाहा यादी

  • Written By: Last Updated:

Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024 Winners) घोषणा केली. एकूण 34 जणांना यंदा हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये पार्वती बरु, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सोमन्ना, सर्वेश्वर, सांगनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे (Uday Deshpande) यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

जुन्नरमध्ये शरद पवार गटाला खिंडार; अतुल बेनकेंचा रामराम, अजित पवारांचा धरला हात 

आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मल्लखांब या भारतीय खेळाला जागतिक नकाशावर आणण्याचे श्रेय उदय देशपांडे यांना जाते. मल्लखांब पितामह अशी ओळख असलेले देशपांडे यांनी जगभरातील ५० देशांमध्ये ५ हजारांहून अधिक लोकांना मल्लखांब प्रशिक्षण दिलं.

पद्म पुरस्कार हा भारतरत्नानंतरचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिला जातो. भारत सरकारकडून 1954 पासून पद्म पुरस्कार दिले जात आहेत. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, वाणिज्य आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी कार्यक्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

बिहार सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी आधी काडी टाकली ! लालूंच्या मुलीने आगीत तेल ओतले 

यंदा पद्मश्री पुरस्कार कोणाला जाहीर?

१.  पार्वती बरुआ- ६७ वर्षे, आसाम, सामाजिक कार्य (पशु कल्याण)

२. जागेश्वर यादव- ६७ वर्षे, छत्तीसगड सामाजिक कार्य (आदिवासी)

३. चामी मुर्मू – ५२ वर्षे, झारखंड सामाजिक कार्य (पर्यावरण)

४.  गुरविंदर सिंग – ५३  वर्षे, हरियाणा, सामाजिक कार्य (अपंग)

५. सत्य नारायण बलेरी – ५० वर्षे, केरळ (कृषी)

६. दुक्खु माझी – ७८ वर्षे, पश्चिम बंगाल सामाजिक कार्य (पर्यावरण)

७. के चेल्लामल – ६९ वर्षे, अंदमान निकोबार (शेती)

८. संगथंकिमा –  ५३ वर्षे, मिझोराम, सामाजिक कार्य (चिल्ड्रेन)

९. हेम चंद्र माझी-  ७० वर्षे, छत्तीसगड (आयुष)

१०. यानुंग जामोह लेगो – ५८ वर्षे, अरुणाचल प्रदेश (कृषी)

११.  सोमन्ना – ६६  वर्षे, कर्नाटक, सामाजिक कार्य (आदिवासी)

१२. सर्वेश्वर बासुमेतेरी – ६१  वर्षे, आसाम, (कृषी)

१३.  प्रेमा धनराज – ७१, कर्नाटक (औषध)

१४.  उदय विश्वनाथ देशपांडे – ७० वर्षे, महाराष्ट्र (मलखांब प्रशिक्षक)

१५. याज्की मोनक्शॉ इटालिया – ७२  वर्षे, गुजरात

१६. शांती देवी पासवान आणि शिवन पासवान – गोडना चित्रकार

१७. रतन कहार – भादू लोकगायक

१८. अशोक कुमार बिस्वास – विपुल टिकुली चित्रकार

१९. बालकृष्णन सदनम पुथिया वीटिल – प्रतिष्ठित कल्लुवाझी कथकली नृत्यांगना

२०. उमा माहेश्वरी डी – स्त्री हरिकथा प्रतिपादक
२१. गोपीनाथ स्वेन – कृष्ण लीला गायक

२२. स्मृती रेखा चकमा – त्रिपुरातील चकमा लोईनलूम शाल विणकर

२३. ओमप्रकाश शर्मा – मच थिएटर कलाकार

२४. नारायणन ई पी – कन्नूर येथील ज्येष्ठ तेय्याम लोकनर्तक

२५. भागबत पढण – सबदा नृत्य लोकनृत्य तज्ञ

२६. सनातन रुद्र पाल – प्रतिष्ठित शिल्पकार
२७. बद्रप्पन एम – वल्ली ओयल कुम्मी लोकनृत्याचे प्रतिपादक

२८. जॉर्डन लेपचा – लेपचा जमातीतील बांबू कारागीर

२९. माचिहान सासा – उखरुल येथील लोंगपी कुंभार

३०. गद्दम समैया – प्रख्यात चिंदू यक्षगानम थिएटर कलाकार

३१. जानकीलाल – भिलवाडा येथील बेहरूपिया कलाकार
३२.  दसरी कोंडप्पा – तिसरी पिढी बुर्रा वीणा वादक
३३. बाबू राम यादव – पितळ मारोरी कारागीर

३४. नेपाळ चंद्र सूत्रधार – छाऊ मास्क निर्माता

 

 

follow us