Download App

Padma Awards 2025: अशोक सराफांना पद्मश्री, तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना पद्मभूषण पुरस्कार, राज्याला यंदा अकरा पद्मश्री

Padma Award to Ashok Saraf, अच्युत पालव - कला, अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग, अशोक सराफ-कला, अश्विनी भिडे देशपांडे – कला,

  • Written By: Last Updated:

Padma Award to Ashok Saraf : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. तर ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा राज्यातील अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेत.

Padma Awards 2025 : मारुती चितमप्पली, विलास डांगरे, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झालाय.

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहे. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत. व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

यंदा 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत. यामध्ये 07 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 23 महिला तर 10 हे परदेशी नागरिक आहेत. 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

follow us