Download App

PAK साठी 30 एप्रिल भारी ठरणार!; ‘रॉ’ च्या माजी प्रमुखांना मोदींनी पुन्हा केलं अ‍ॅक्टिव्ह

  • Written By: Last Updated:

Government revamps National Security Advisory Board after Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या उद्देशाने दिल्लीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांच्या मालिका सुरू असून, पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी रोडमॅप तयार केला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करत मोदींनी माजी RAW प्रमुख आलोक जोशी यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद देत मोठी जबाबदारी दिली आहे.

Pahalgam Terror Attack : मोदींच्या फ्री हँडमुळे अधिक आक्रमक होते इंडियन आर्मी; वाचा आतापर्यंतचा इतिहास

नव्या मंडळात कोण कोण?

मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करत माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिवाय  यात माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी दक्षिणी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. सात सदस्यांच्या मंडळात निवृत्त आयएफएस बी व्यंकटेश वर्मा यांचाही समावेश आहे.

मंत्रिमंडळाची बैठक संपली, दुपारी ३ वाजता ब्रीफिंग होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण झाली आहे. दुपारी ३ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची ब्रीफिंग होईल. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सर्वांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईएच्या बैठकांमध्येही भाग घेतला होता.

पंतप्रधान मोदींची बैठक संपताच पाकिस्तानला हादरा; मध्यरात्री दीड वाजता घेतली पत्रकार परिषदसीसीपीए बैठक महतत्वाची का?

सीसीपीएची बैठक खूप महत्त्वाची मानली जाते. सीसीपीए ही मंत्रिमंडळाची सर्वात महत्त्वाची समिती आहे आणि तिची बैठक अनेक वर्षांनी झाली आहे. सीसीपीए देशाच्या महत्त्वाच्या राजकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेते आणि निर्णय घेते. याआधीही अनेक महत्त्वाच्या प्रसंगी सीसीपीएच्या बैठका झाल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर अशा प्रकारची बैठक पार पडली होती. या बैठकीत आर्थिक धोरणे आणि अंतर्गत सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय होतात. याशिवाय, सीसीपीए परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवरदेखील चर्चा करते आणि निर्णय घेते.

Pahalgam Terror Attack: ‘तो’ तिनदा अल्लाहू अकबर म्हटला आणि गोळीबार… हल्ल्याचा गुजरातच्या पर्यटकाने सांगितला थरारपहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसची दुसरी बैठक

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी सीसीएसची बैठक झाली. ज्यामध्ये पाकिस्तानबाबत सिंधू पाणी करार रद्द करण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

follow us