Download App

दहशतवादी हल्ल्याला सडतोड उत्तर! राजनाथ सिंह यांची सैन्य अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीयं.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हल्ला करीत 26 जणांचा जीव घेतलायं. हल्ला घडल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीय. या बैठकीला जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल एपी सिंह, नौदलाचे प्रमुख दिनेश त्रिपाठी उपस्थित होते.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या उत्तरासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केलीयं. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झालीयं. ज्या भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, त्या भागात जवानांना तैनात करण्यात आलं असून लवकरात लवकर हल्लेखोरांना पकडण्यासाठी जवानांकडून प्रयत्न सुरु आहेत. या हल्ल्यासंदर्भात केंद्रीय समितीची बैठक आज पार पडणार आहे.

Pahalgam Terror Attack : हाफिज सईदशी कनेक्शन अन् आधुनिक शस्त्रांचा शौकीन; मास्टरमाईंड नेमका कोण?

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे शहीद नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पण केलीयं. ते म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ला व्यथित करणारा असून हा भ्याड हल्ला आहे. नागरिकांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे.

follow us